सोलापूर: स्थानिक स्वराज संस्थांच्या सर्वसाधारण सभेत नेहमी सत्ताधारी आणि विरोधकांच्यामध्ये वादावादी पाहायला मिळते. मात्र, सोलापूर महानगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी नगरसेवकानेच खुर्ची भिरकावल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपच्या नगरसेवकाने पालिका सदस्यांच्या सभेत खुर्ची भिरकावली. (Solapur Municipal Corporation Meeting turmoil)
सभेतील विषय बदलल्यानं संताप
सोलापूर महापालिकेत आयुक्त पी.शिवशंकर आणि महापौर शोभा बनहट्टी यांच्या उपस्थितीत पालिकेची सभा सुरु होती. यासभेतील विषय ऐनवेळी बदलण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकानं खुर्ची भिरकावली. सुरेश पाटील असं खुर्ची भिरकवणाऱ्या नगरसेवकाचे नाव आहे. सुरेश पाटील हे भाजपचे नगरसेवक असून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय बदलण्यात आल्यानं खुर्ची भिरकवल्याचे त्यांनी सांगितलं. (Solapur Municipal Corporation Meeting turmoil)
सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पार्टी मिटींगमध्ये सोलापुरातील मिनी आणि मेजर गाळ्यांच्या विषयावर चर्चा झाली होती. मात्र, सर्वसाधारण बैठकीत विषय बदलण्यात आले. त्यामुळे संतप्त होऊन खुर्ची भिरकवल्याचं सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले. (Solapur Municipal Corporation Meeting turmoil)
नागरिकांच्या प्रश्नाकडं सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष?
सोलापूर शहरातील नागरिकांवर महापालिकेने शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छता उपयुक्तता कर लावला आहे. त्याची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आता युजर चार्ज बरोबर सहाशे ते 18 हजार रुपयापर्यंत कर लावला जात आहे. मात्र असं असताना सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी चर्चा सुरु आहे. शहरातील गाळ्यांच्या बाबतीत मध्यरात्रीपर्यंत पार्टी मीटिंगमध्ये चर्चा होते. मात्र, नागरिकांच्या हितापेक्षा स्वःताला महत्त्व देण्याच्या सत्ताधारी भाजपचा लोकांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.(Solapur Municipal Corporation Meeting turmoil)
रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : मुख्यमंत्री#uddhavthackeray #marathareservationhttps://t.co/Pf4kUgoYXY
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
संबंधित बातम्या:
सोलापुरात बापलेकीच्या नात्याला काळिमा, जन्मदात्याचा चिमुरडीवर बलात्कार, आईची तक्रार
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त नागपूर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सायकलवारी!
(Solapur Municipal Corporation Meeting turmoil)