सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला आपल्या अदाने घायाळ केलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील हिचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खरंतर सबसे कातील असं म्हणताच अनेकांची तोंडून गौतमी पाटील असं नाव आपसूकच येतं. गौतमी पाटील कोण आहेत असा प्रश्न विचारला तर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही असा एखादा तरुण सापडणार नाही. गौतमी पाटील हीचे संपूर्ण महाराष्ट्रात लावणीचे कार्यक्रम प्रसिद्ध आहे. गौतमी पाटीलची तारीख भेटण्यासाठी एक महिनाभर प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे गौतमी पाटील हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये जिथे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात गोंधळ हा ठरलेला असतो. त्यामुळे गौतमी पाटील ही सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेले नृत्यांगना आहेत.
गौतमी पाटील हिचा लवकरच घुंगरू हा चित्रपट येत आहे. लोक कलावंतांच्या जीवनशैलीवर असलेल्या चित्रपटात गौतमी पाटील हि प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रकरणाचा अखेरचा टप्पा पूर्ण झाला असून लवकर चित्रपट प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.
खरंतर गौतमी पाटील ही घुंगरू चित्रपटाच्या माध्यमातुन पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. माढ्यात अखेरचे चित्रीकरण पुर्ण झाले असून घुंगरू चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
लोककलावंताची व्यथा मांडणारा घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा चित्रपट आहे असं गौतमी पाटील हिने म्हंटलं आहे. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करत असतात आणि त्याच प्रेक्षकांमुळेच आज मी उभी आहे असेही गौतमी पाटील हिने म्हंटलं आहे.
माझ्या वर जसं प्रेम केलं तसं महाराष्ट्रातील चाहत्यांनी घुंगरु चित्रपट पाहुन प्रेम दाखवावं असे म्हणत गौतमी पाटील हिने घुंगरू चित्रपटात अभिनय करताना अनेक अनुभव आल्याचेही म्हंटलं आहे. त्यादरम्यान गौतमी पाटील काहीशी भावुक झाली होती.
गौतमी पाटील हिने घुंगरू चित्रपट अतिशय महत्वाची भूमिका साकारली आहे. यामध्ये गौतमी हिने व्यथा मांडतांना काही अनुभव असे होते की त्याचे तिला खूप वाईट वाटत होते असेही तिने म्हंटलं आहे. प्रेक्षकांना आवडेल अशी भूमिका साकारली असल्याचा विश्वास गौतमीने व्यक्त केला आहे.
खरंतर गौतमी पाटील हीचा पहिला चित्रपट कसा असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सोलापूर मध्ये नुकतेच तिचे शूटिंग संपले आहे. त्यामुळे आता चित्रपट कधी प्रदर्शित होईल अशी चर्चा असतांना गौतमी पाटील हिने चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.