राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज सोलापूरमधील मोहोळमध्ये आहे. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी वीजबीलावर भाष्य केलं. पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे बील माफ झालेले असेल. महायुती सरकार आणा पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल. काही योजना या आउट डेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बीलसाठी अनुदान मिळायचे. मात्र आता यापुढे वीजबिल द्यायचे नाही आणि मागचे बील द्यायचे नाही. पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे बील माफ झालेले असेल. महायुती सरकार आणा पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल, असं अजित पवार म्हणाले.
काही योजना या आउट डेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बीलसाठी अनुदान मिळायचे. मात्र आता यापुढे वीजबिल द्यायचे नाही आणि मागचे बील द्यायचे नाही. आमचं सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल, असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला.
50% फी भरायला नव्हते म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. अरे मुली काय आत्महत्या करायला जन्माला येते की काय? म्हणून मी सचिवाला बोलवले आणि विचारले किती खर्च येईल. त्यानंतर आम्ही मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
पुढील निवडणुकीमध्ये एक तृतीयांश महिला या लोकसभा आणि विधानसभेत जाणार आहेत. घरातील महिला सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळी कामं करते. त्यांना कोणी आजपर्यंत विचारले का? आम्ही पण आम्हाला दोषी समजतो कारण मी पण इतके वर्षे त्याचा विचार केला नाही. माजी मंत्री सुनील केदार म्हणाले आम्ही सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करू… ही योजना बंद करायला काय तुझ्या घरची योजना आहे का?, असं अजित पवार म्हणाले. त्याचवेळी उपस्थितांमधून आवाज आला की, बापाची योजना आहे का? त्यावर अजित पवार म्हणाले, बरोबर आहे, बरोबर आहे… मी तसं म्हणू शकत नाही. फार तर म्हणू शकतो, तुमच्या वडिलांचे आहे का? अजित पवारांच्या या मिश्किल टिप्पणीनंतर सभेत हशा पिकला.