उजणी धरणात काल संध्याकाळी वादळी वारा आणि पावसाने बोट उलटून अपघात झाला होता. त्यात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी रात्री शोध मोहिम थांबविण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. त्यात बुडालेली लाँच सापडली होती. NDRF पथकाने शोध मोहिम राबविल्यानंतर सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर घटनास्थळी
दरम्यान धरण पात्रात जिथे बोट बुडाली त्याठिकाणी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोटीने दाखल झाले आहेत. NDRF च्या बोट मध्ये बसून ते घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी 35 फूट पाण्याखाली एका खडकावर अडकली आहे. त्याठिकाणी चप्पल, पर्स, हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या आहेत. लवकरच पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसेस विजय दशरथ शिवतारे वारजे माळवाडी टीम दाखल झाली आहे. बनारसी चौहान ही व्यक्ती आता तळाशी शोध घेणार आहे. करमाळा आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं
करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जोरदार हवेने प्रवासात अडथळे येत होते. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. बोट भीमा नदीत बुडाली. या नावेत एकूण सात प्रवासी होते. त्यात एक वर्षांचे मुल असल्याचे समोर येत आहे. त्यातील एक प्रवाशी पोहता येत असल्याने पोहत किनाऱ्यावर आला. वादळी वारे आणि जोरदार पावसाने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
सहा प्रवासी अद्याप बेपत्ता
आतापर्यंत सहा प्रवाशांची कुठलीच माहिती समोर आलेली नाही. रात्री शोध मोहिमेअत डथळे आले. रात्री जवळपास 9 वाजता शोध मोहिम थांबविण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. NDRF ची टीम कळशी गावात पोहचली आणि तिने शोध मोहिम सुरु केली आहे. शोध मोहिमेसंबंधीचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे.
#WATCH महाराष्ट्र: पुणे जिले के इंदापुर तहसील के नजदीक कलाशी गांव के पास उजानी बांध के पानी में कल शाम एक नाव पलटने के बाद लापता हुए छह लोगों की तलाश और बचाव अभियान जारी है। https://t.co/z16i9mgXze pic.twitter.com/Vqm82krinI
— ANI_HindiNews (@AHindinews) May 22, 2024
पोलिसांचे म्हणणे काय
पुणे ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी व्यापक शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि पोलिस शोध मोहिमेत सहभागी आहेत. दुर्घटनेवेळी चार पुरुष, दोन महिला आणि दोन छोट्या मुलींसह एकूण 8 प्रवाशी या बोटीत होते. त्यातील एक जण पोहता येत असल्याने वाचला.
हे सहा जण बेपत्ता