सोलापूर – शहाजीबापू पाटील हे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. मागच्या वेळी गुवाहाटीला गेल्यानंतर काय डोंगर, काय झाडी, ही डायलॉग प्रसिद्ध झाली होती. यासंदर्भात बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, आम्ही शिवसेना बचावचा उठाव केला होता. त्यावेळी आम्हाला गुवाहाटीला जावं लागलं होतं. ती वैचारिक आणि महत्त्वाची अशी लढाई होती. ती जिंकावी, अशी मनोधारणा कामाख्या मातेकडं विनंती केली होती. पूजारी यांनी एकनाथ शिंदे यांनी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहात, असं भाकित केलं होतं. त्यानंतर पुन्हा कामाख्यादेवीच्या दर्शनाला येणार असंही म्हटलं होतं. नवस फेडण्यासाठी त्याठिकाणी चाललोय. दर्शन घेऊन आपआपल्या मतदारसंघात जाणार आहोत, असंही पाटील यांनी सांगितलं.
तिथंल्या भावभावनांचं विश्व ताज्या होणार आहेत. माझ्या त्या संवादानं मिळालेली प्रसिद्धी आणि जनतेनं केलेलं मायदेशी भाषेचं कौतुक यामुळं निश्चितपणानं कामाख्यादेवीच्या दर्शनानं माझ्या डोळ्यात अश्रू येणार आहेत.
गुवाहाटी येथे वर्षातून एक वेळा आम्ही पती-पत्नी दरवेळी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊ, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.
गेल्यावेळी परिवर्तन करण्यासाठी गेलो. यावेळी एकजुटीनं विकास करण्याचा संकल्प करणार आहोत. कर्नाटकच्या यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी असं वादग्रस्त विधान केलं होतं. पण, एक एकर जमीनसुद्धा आम्ही सोडणार नाही. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देणार आहे.
बेळगाव, खानापूरसह अखंड महाराष्ट्र पुन्हा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्मित केलेल्या महाराष्ट्रातील मावळे अद्याप जिवंत आहेत, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.