सोलापूर : सोलापुरातील विशाल फटे प्रकरण ताजे असतानाच आता पंढरपूरात कट्टे घोटाळा(Fruad) समोर आलाय. दामदुप्पट पैसे देतो असे सांगून गुंतवणूकदाराची 15 लाखाची फसवणूक केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रथमेश सुरेश कट्टे (Prathamesh Suresh Katte) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशमेश कट्टेसह आणि आणखी एकावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश कट्टे हा पंढरपूर येथील संकल्प पंतसंस्थेचा चेअरमन आहे. अल्पावधीत पैसे दुप्पट करुन देतो असे सांगून कट्टे आणि कारके या दोघांनी फिर्यादीकडून 15 लाख रुपये घेतले होते. मात्र हे पैसे परत न मिळाल्यामुळे फिर्यादीने पोलीस ठाणे गाठले. (Fraud of Rs 15 lakh in Pandharpur claiming double income from stock market)
फियार्दी भिसे नामक व्यक्ती आणि कट्टेची आधीपासून ओळख होती. एकदा गप्पा मारताना शेती खरेदी करण्याची इच्छा भिसेने कट्टेकडे बोलून दाखवली. याच संधीचा फायदा घेत कट्टे आणि दुसरा आरोपी कोरके यांनी शेअर बाजारात पैसे गुंतवून दुप्पट करण्याचे आमिष भिसेला दाखवले. आरोपीसोबत आधीपासून ओळख असल्याने भिसेही त्याला पैसे द्यायला तयार झाला. यासाठी आरोपीने भिसेला एचडीएफसी बँकेतून 15 लाखाचे कर्जही मिळवून दिले. दामदुप्पट पैसे मिळण्याच्या आमिषाने भिसेने 9 सप्टेंबर 2019 रोजी 15 लाख रुपये प्रथमेश कट्टेच्या खात्यात जमा केले. मात्र अद्याप कट्टेने पैसे परत न केले नाही. कट्टेकडे पैसे मागितल्यानंतर तो वारंवार टाळाटाळ करत होता. अखेर आपली फसणवूक झाल्याचे लक्षात येताच भिसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सोलापूरमधील बार्शीमध्येही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती. शेअर बाजारात गुंतवणूक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांनी कोट्यवधीचा चुना लावल्याचे विशाल फटे घोटाळा प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले. याप्रकरणी विशाल सध्या पोलीस कोठडीत आहे. या घोटाळा प्रकरणात विशालसह त्याच्या वडिलांचा आणि भावाचाही सहभाग त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. फटेने शेअर बाजारात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत 81 गुंतवणूकदारांनी तब्बल 18 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विशालसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशालने कोण-कोणाकडून किती पैसे घेतले ? या पैशाचे त्याने काय केले ? याबाबत पोलीस फटेची कसून चौकशी करीत आहेत. (Fraud of Rs 15 lakh in Pandharpur claiming double income from stock market)
इतर बातम्या
200ची पावती घेऊन 1200 वसूल करणाऱ्या लुटारी कर्मचाऱ्यांची अखेर बदली! शिस्तभंगाचीही कारवाई
धक्कादायक ! पिंपरीत आपटी बॉम्बबरोबर खेळताना एका 4 बालिकेचा मृत्यू , दोन जखमी