सांगली – सांगलीत आज राजकीय व्यक्तींची चांगलीच मांदीयाळी पाहायला मिळाली. वाळवा तालुक्यात राजारामनगर येथे प्रतीक पाटील यांचा विवाह सोहळा पार पडला. जयंत पाटील याचं पुत्र प्रतीक पाटील हे अलिका यांच्याशी विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक सर्व मोठे नेते उपस्थित होते. जयंत पाटील स्वतः पाहुण्याचं आदरतिथ्यानं स्वागर करत होते. त्यात अजित पवार हेही पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते.
तेवढ्यात उदयनराजे भोसले आले. उदयनराजे हे आधी राष्ट्रवादीत होते. त्यानंतर त्यांनी भाजपची वाट धरली. पक्ष बदलला असला तरी अजित पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं दिसून आले. अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांचे स्वागत केले.
दुसरीकडं शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई हे विवाह सोहळ्यात उपस्थित झाले. अजित पवार यांच्याशी शंभूराजे देसाई यांचं बोलणं झालं. अजित पवार म्हणाले, आहो राजे, तुम्हा काय भागभांडवलं घेतलंय काय. त्यानंतर अजित पवार यांनी शंभूराजे देसाई यांना जवळ बोलावलं. त्यानंतर स्थानापन्न होण्याची विनंती केली.
याशिवाय बरेच राजकीय मंडळी या विवाह सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळं राजकीय नेत्यांची मांदीयाळी असल्याचं दिसून आलं. विशेषता राष्ट्रवादीचे जवळपास सर्व मोठे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यास दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे, नरहरी झिरवड यांनी उपस्थिती लावली. प्रतीक पाटील यांनी २०१४ पासून वाळवा-इस्लामपूर मतदारसंघात राजकीय कारकिर्द सुरू केली आहे. सध्या ते मतदारसंघाकडं लक्ष देताहेत.