सोलापूर: दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील वळसंग (Walasang) येथे दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या दोन राजकीय नेत्यातील वर्चस्ववादातून दोन गटात दगडफेक (Throwing stones in two groups) करण्यात आली आहे. यामध्ये काही जण जखमी झाले असून एकामेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रहार संघटनेचा (Prahar Sanghtana) दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मोहसीन तांबोळी आणि भाजप समर्थक यासीन कटरे या नेत्यांच्या गटाकडून दगडफेक करण्यात आली आहे.
एकमेकांकडे खुन्नस देऊन बघण्याच्या कारणावरून दगडफेक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. वळसंग पोलिसांकडून दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
दगडफेक का करण्यात आली आहे याचा तपास पोलीस करत असून एकमेकांविरोधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दोन गटात तुफान हाणामारी झाल्यामुळे आणि दगडफेक झाल्यामुळे अनेक जण या जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परांविरुद्ध तक्रार दाखल केली असून 71 जणांवर गुन्हा झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वळसंग येथील मोहसीन तांबोळी यांच्या फिर्यादीनुसार यासीन कटारेसह 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यासीन कटरे याच्या फिर्यादीनुसार मोहसीन तांबोळीसह 36 जणांवर वळसंग पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मोहसीन वजीर तांबोळी, सैपन वजीर तांबोळी, हारुण बाबू फुलारी, मोहसीन ईसाक फुलारी, यासीन अब्बास कटरे, हजरत अब्बास कटरे, जावेद अब्बास कटरे, सोहेल अल्लाउद्दीन कटरे यांना अटक करण्यात आली असून तर उर्वरित संशयितांची धरपकड सुरू असल्याची माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले.