माढा, सोलापूर : एखादा नेते आरोपाखाली जेलमध्ये गेला की कार्यकर्ते शांत होतात. पण, ते परत आल्यास पु्न्हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो. असा काहीसा प्रकार नुकताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबतीत घडला. ते जेलमधून परत आल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) त्यांचे जल्लोषात स्वागत केले. नागपुरातील त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. असाच काहीसा प्रकार मोहोळ येथे दिसून आला. राष्ट्रवादीचे माजी आमदार जेलमध्ये गेले होते. तब्बल आठ वर्षानंतर ते परत आले. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना तुरुंगात जाव लागलं. गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ते गेली ८ वर्षे तुरुंगात होते. रमेश कदम यांना नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला.
रमेश कदम यांचे समर्थक अॅक्टिव्ह झाले आहेत. माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपक पवार या समर्थकाने लावलेला डिजिटल बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे. लगाओ अब कितना भी दम…! अब आगए रमेश कदम! आपल्या हक्काचा माणूस पुन्हा आलाय. असा आशय फलकावर लिहिण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचा फोटोदेखील लावण्यात आलाय.
रमेश कदम हे माजी आमदार आहेत. त्यामुळे या भागात रमेश कदम यांना मानणारे बरेच कार्यकर्ते आहेत. पण, सेनापती जेलमध्ये गेल्यापासून ते शांत होते. आता आठ वर्षांनंतर रमेश कदम हे पुन्हा परत आले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. रमेश कदम यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या नावाची बॅनरबाजी करण्यात आली.
इकडे नागपुरात अनिल देशमुख अॅक्टिव्ह झाले आहेत. ते त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत आहेत. तसेच रमेश कदम हे आता त्यांच्या भागात अॅक्टिव्ह होतात का, हे पाहावं लागेल. त्यांचे काही कार्यकर्ते जोमात आले आहेत.