सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur-Pune National Highway) फटाक्यांच्या (Firecrackers) ट्रकवर वीज (Lightning) पडली. त्यानंतर फटाके फुटले. त्यामुळे ट्रक मात्र जळून खाक झाला आहे. माढा तालुक्यातील वरवडे टोलनाक्याजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली. महामार्ग पोलीस आणि टेभुर्णी पोलिसांनी तत्परतेने मदत करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून जीवितहानी झालेली नाही. मात्र लाखो रुपयांचा फटाक्यांचा माल आणि ट्रक जळून खाक झाला आहे. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने फटाके घेऊन हा ट्रक चालला होता. चालत्या स्थितीत ट्रकवर वीज पडताच त्यातले फटाके फुटण्यास सुरुवात झाली. चालकाने प्रसंगावधानता राखून ट्रक महामार्गावरून बाजुला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
#Solapur : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर फटाक्यांच्या ट्रकवर वीज पडली. त्यानंतर फटाके फुटले. तर ट्रक जळून खाक झाला. #Lightning #firecrackers #highway
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/0vqG5Qfy9r— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2022