PM Narendra Modi : कृषी योजनांवरुन विकासाचा विचारला जाब; शरद पवार यांच्यावर मोदींचा पुन्हा निशाणा

| Updated on: Apr 30, 2024 | 2:32 PM

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रात तळ ठोकून आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. काल तोफ डागल्यानंतर आज माढ्यात त्यांनी पुन्हा पवारांना लक्ष्य केले. त्यांनी कृषीमंत्री असताना त्यांनी काय केले असा सवाल विचारला. तर गेल्या दहा वर्षांतील कृषी योजनांची जंत्रीच वाचून दाखवली.

PM Narendra Modi : कृषी योजनांवरुन विकासाचा विचारला जाब; शरद पवार यांच्यावर मोदींचा पुन्हा निशाणा
नरेंद्र मोदी
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पवार हे कृषी मंत्री असताना त्यांनी काय केले असा सवाल त्यांनी विचारला. त्यांच्या कार्यकाळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मी पत्रे पाठवून थकलो पण काहीच झाले नाही असा आरोप त्यांनी केला. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांची जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. मोदींची हीच गॅरंटी असल्याचा पलटवार त्यांनी विरोधकांवर केला.

सिंचन योजनांसाठी बळ

मोदी म्हणाले की, देशात सिंचन योजनांवर माझा भर आहे. देशात काँग्रेसच्या काळात सिंचन योजना लटकविण्यात आल्या. त्या पुढे सरकरल्याच नाहीत. पण आपल्या सरकारने या सर्व सिंचन योजना प्रत्यक्षात उतरविल्या. देशात जवळपास 100 सिंचन योजनेतील 63 योजन पूर्ण झाल्या आहेत. तर इतर योजना पण लवकरच पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत 11 कोटींहून अधिक घरांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहचवले आहे. तर गेल्या 10 वर्षांत मायक्रो इरिगेशन दुप्पटीवर पोहचले आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यावर मी स्वतःचे नाव कोरुन कोणताही स्तंभ उभारला नाही. तर 75 अमृत सरोवर योजना राबविण्याचा संकल्प सोडला. शेतकरी आणि शेती यांना त्यांचा फायदा होईल, हे माझे उद्दिष्ट आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रात सहकारीता स्वतंत्र मंत्रालय

देशातील ग्रामीण भागात सहकारीता मजबूत व्हावी यासाठी केंद्रात सहकार मंत्रालय स्वतंत्रपणे सुरु करण्यात आले आहे. देशात 2019 साली 10000 किसान उत्पादक संघ तयार करण्याचा संकल्प घेतला आणि तडीस नेला. या उत्पादक संघाने आता ऑनलाईन विक्रीपासून परदेशात निर्यातीपर्यंतचा पल्ला गाठला आहे. देशात लवकरच 27 सरकारी समित्या गठित होतील. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याचा साठा करता यावा यासाठी अन्नधान्य भंडारणर योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. या संकल्पत्रात आम्ही बटाटे, कांदा आणि टोमॅटो शेतकऱ्यांसाठी आमची कटिबद्धता जाहीर केलेली आहे.

त्यावेळच्या कृषी मंत्र्यांनी काय केले

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात त्यांच्या सरकारच्या विकास योजनांची जंत्री वाचून दाखवत असतानाच शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या कार्यकाळात ऊसाची एफआरपी केवळ 200 रुपये होती. आता एफआरपी 340 रुपये प्रति क्विटंल असल्याचे ते म्हणाले. शरद पवार हे देशाचे कृषीमंत्री असताना ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्याकडे एरिया पेमेंटसाठी फेऱ्या मारायचे. पण आता देशभरात 70% एरिया पेमेंट करण्यात आले. 2014 मध्ये देशात 57000 हजार कोटींचे एरिया पेमेंट करण्यात आले. या वर्षी हा आकडा 114000 कोटींवर पोहचल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यात 32000 कोटी शेतकऱ्यांना मिळाल्याचे ते म्हणाले.
  • साखर कारखान्यांना आयकराच्या जाचातून सोडविण्यासाठी मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शरद पवार यांना अनेक पत्र लिहिली. पण या योजनेवर केंद्रीय कृषीमंत्री असतानाही त्यांनी कुठलेच समाधान दिले नाही. मला आता तुमचा मुलगा म्हणून सेवेची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे 70000 कोटी रुपये मिळाल्याचे ते म्हणाले.