पंढरपूरः राज्यशासनाकडून करण्यात येणारा कॉरिडॉर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे पंढरपुरातील लोकांच्या घरांचे आणि इतर प्रकारचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नुकसान होणाऱ्या नागरिकांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार असल्याची भूमिका पंढरपुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी स्पष्ट केले.
यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील चाळीस गावं आणि सोलापूर आणि अक्कलकोटवर त्यांनी दावा केल्या नंतर दिलीप धोत्रे यांनी बसवराज बोमई यांची मागणी चुकीची असून त्यांना इथे पायही ठेऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर पंढरपुरातील काही नागरिक, व्यावसायिक आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी इच्छूक असल्याचे मत व्यक्त केल्या नंतर त्यांनी ज्यांना कर्नाटकात जावं वाटतं, त्याच्याबद्दल प्रेम वाटत असेल तर त्यांनी तिकडं जावं असा टोलाही त्यानी लगावला आहे.
पंढरपुरातील ज्या लोकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही घेऊन येऊ असा नारा दिला आहे. त्यांना विरोध करत, ज्यांना कर्नाटकात जावं वाटतं आहे.
त्यांनी खुशाल कर्नाटकात जावे टोलाही दिलीप धोत्रे यांनी लगावला आहे. बसवराज बोमई यांनी केलेला दावा चुकीचा असून त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र वाद प्रचंड वाढला आहे. त्यातच जत तालुक्यातील चाळीस गावांसह सोलापूर, अक्कलकोट यांच्यावर मुख्यमंत्री बोमई यांनी दावा केल्यामुळे पंढरपूरसह परिसरातील नागरिकांनी या दाव्याला जोरदार विरोध केला आहे.
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला असल्याने आता महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून कोल्हापूरतही ठाकरे गटाने जोरदार आंदोलन करुन कर्नाटकच्या बसला काळे फासून त्याच्या जय महाराष्ट्र लिहिले होते.