मुंबई: राज्यासह आणि देशासह ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर चर्चेत आलेले सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक डॉ. रणजितसिंह डिसले यांना आता आणखी एक महत्वाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉ. रणजितसिंह डिसले (Dr.Ranjitsinh Disale) यांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार (Dr. APJ Abdul Kalam Pride of India Award) जाहीर करण्यात आला आहे. याबद्दलचे डिसले गुरुजींनी ट्विट (Twitter )करत ही माहिती दिली आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
खरं तर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय.
या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित . pic.twitter.com/Z0MSIYFvKY— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) July 25, 2022
रणजितसिंह डिसले हे तंत्रज्ञानामधील अभिनव प्रयोग करत असल्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, खरंतर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित.
रणजितसिंह डिसले गुरुजी यांना फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाल्याने ते सध्या 8 ऑगस्ट रोजी अमेरिकेला रवाना होणार आहेत.
रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती, या स्कॉलरशिपसाठी ते अमेरिकेमध्ये सहा महिने अभ्यास करणार आहेत. त्यांनी या पुरस्कार मिळाल्याचे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावरही शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.