सोलापूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्याचा कारभार चालवू लागले. तर महाविकास आघाडीला अडीच वर्षात पायउतार व्हावे लागल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप असा वाद आता रंगला आहे. त्यातच आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज सोलापूरातील करमाळा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे हे फेसुबकवरचे मुख्यमंत्री असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता पुण्याच्या पुढाऱ्यांनी फक्त मृगजळ दाखवण्याची सवय लावली असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या प्रमाणे त्यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री सांगायचे माझं कुटुंब, तुमची जबाबदारी अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे नाव घेतले नाही मात्र पुण्याच्या पुढाऱ्यांना फक्त मृगजळ दाखविण्याची सवय लावली आहे अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे.
पुण्याच्या पुढाऱ्यांना फक्त मृगजळ दाखविण्याची सवय आहे हे असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्याचे पाणी कधी पुण्याला गेले हे तुम्हाला समजलेही नाही, आपण फक्त झेंडे खांद्यावर घेऊन आयुष्यभर फिरत राहिला अशी बोचरी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
करमाळा येथील स्वर्गीय दिगंबरराव बागल कृषी महोत्सवावेळी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.