2014 साली शरद पवार यांनी भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला होता.नुसता पाठिंबा दिला नव्हता तर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांना भेटुन सगळी मंत्री पदाची यादी पण तयार केली होती. त्यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सत्तेत घ्यायचं नाही, अशी अट पवारांनी घातली होती, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माढ्यात केला. त्यांनी उद्धव ठाकरेंसह पवारांवर हल्लाबोल केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्ष 400 हून अधिक जागी निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव यांनी पवारांपासून दूर राहावे
त्यावेळी मोदी आणि शाह यांनी शिवसेनेला सोडून चालणार नसल्याचे शरद पवार यांना ठणकावल्याचे खोत म्हणाले. शिवसेना संपवण्याचे कटकारस्थान शरद पवारांनीच रचलेले आहे.शरद पवारांपासून उद्वव ठाकरेनी लांब रहावं.ही आग ले बेकार आहे, असा टोला त्यांनी हाणला. उद्धव ठाकरेनी फडणवीसांना नालायक म्हणण्यापेक्षा त्यांनी नवरी पळून गेल्यातला प्रकार दाखवू दिल्याची टीका त्यांनी केली.
पवार हे अलिबाबा
शरद पवार शेतकऱ्यांना चुणा लावत आहेत. शरद पवारांना मोदीनी केलेली कामे दिसणार नाहीत.कारण पवार अलिबाबा आहेत. मोदीनी जनतेची कामे केली.पवारांनी टोळी तयार करुन बँका, साखर कारखाना, दूध संघ-सूतगिरण्या हडपण्याचे काम केले, असा आरोपही सदाभाऊंनी केला.
अजित पवारांना उशीरा कळले
राज्यपाल राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांना पहाटे शपथ विधीला पाठवले होते.घरातले असून सुध्दा शरद पवार अजित पवार कळले नाहीत. आम्हांला ले अगोदर समजले होते, असा टोला त्यांनी हाणला. शरद पवारांचा इतिहास पाहिला तर वसंतदादा पाटील यांचेपासून ते आता पर्यंत ते पाठीत खंजीर खुपसत आले आहेत. त्यामुळे त्यांना खंजीर खुपश्या म्हटले तर चुकीचं ठरणार नाही.बारामतीत सुनेत्रा पवार निवडून येणार आहे. पवारांना साडेसातीचा फेरा लागलेला आहे. त्यांना हे या जन्मातच फेडावं लागणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील जनता स्वाभिमानी आहे.माझ्या सारख्या फकिराला 5 लाख मते दिली होती. निंबाळकराना अवघड जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.