सोलापुरात राहुल गांधी यांची सभा होत आहे. या सभेत राहुल गांधी यांनी स्थानिकांना संबोधित केलं. यावेळी एक योजना आणण्याचा मानस राहुल गांधी यांनी बोलून दाखवला आहे. काँग्रेस पक्ष महालक्ष्मी योजना आणणार आहे. गरीब लोकांची लिस्ट बनवून वर्षाला एक लाख रुपये त्यांच्या खात्यात देणार. प्रत्येक वर्षी ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर एक लाख रुपये देणार. देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मात्र ही फक्त सुरुवात आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक कमिशन नेमणार आहे. हे कमिशन शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफीची शिफारस करेल तेव्हा तेव्हा कर्ज माफ करणार. देशातील शेतकऱ्यांच्या मालाला MSP देणार, असा शब्द राहुल गांधी यांनी दिलं आहे.
नरेंद्र मोदींनी देशाला अन्यायाची राजधानी बनवले आहे. नरेंद्र मोदी हे अदानीचे कर्ज माफ करतात. मात्र काँग्रेस पार्टी शेतकरी, दलित, गरिबांचे कर्ज माफ करणार आहे. जे श्रीमंतांच्या मुलाला मिळते तेच गरिबाच्या मुलाला मिळणार.- आमचं सरकार आल्यावर देशात जातनिहाय जनगणना करणार. नरेंद्र मोदी हे अरब पतींचे नेते आहेत गरिबांचे नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
नरेंद्र मोदींची सवय आहे की जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा ते खोटं बोलायला सुरू करतात. जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा ते पाकिस्तान, चायनाची गोष्ट करतात. मात्र काही झाले तरी यावेळेस ते सुटणार नाहीत.-नरेंद्र मोदी घाबरले कारण त्यांना माहिती आहे. निवडणूक हातून जात आहेत. रस्त्यावर होणारे वाटमारी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली आहे. हे सांगतायेत की आम्ही राजकीय भ्रष्टाचार संपवतोय, असं राहुल गांधी यांनी सोलापूरच्या सभेत म्हणाले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अर्ज मागे घेतलेले उमेदवार राहुल गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. राहुल गांधी यांच्या सोलापुरातील सभेला स्थानिकांची उपस्थिती होती. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर आणि विशेषत: नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.