शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खडा सवाल, सांगा, काय चुकीची गोष्ट केली?

| Updated on: Dec 08, 2024 | 12:16 PM

Sharad Pawar Asked Question To CM Devendra Fadnavis : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात शरद पवार आज आहेत. इथल्या स्थानिक लोकांशी शरद पवार बोलत आहेत. मारकडवाडीत बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केलेत. वाचा सविस्तर...

शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खडा सवाल, सांगा, काय चुकीची गोष्ट केली?
शरद पवार, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Facebook
Follow us on

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधल्या मारकडवाडी गावात शरद पवार आज आहेत. या गावात मॉक पोलिंगचा (बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान) घेण्यात आला. पण पोलिसांनी जमावबंदी केल्याने मॉक पोलिंग झालं नाही. या गावाला शरद पवार यांनी भेट दिली. तेव्हा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केलेत. काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली. तुमच्या गावी येणं चुकीचं आहे? तुमचं म्हणणं ऐकणं चुकीचं आहे?काही पद्धतीबाबत लोकांच्या मनात शंका आली. त्याची माहिती घेऊन त्याचं निरसन करणं हे चुकीचं आहे? लोकशाही कशासाठी आहे. लोकांचे अधिकार काय आहे. हे अधिकार जतन करण्यासाटी अडचण येत असेल तर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे, असं शरद पवार म्हणालेत.

शरद पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही. आम्हाला इथे घडलं, इथल्या लोकांच्या मनात शंका आहे. त्याचं निरसन करायचं आहे. असं कुठं होऊ नये जेणे करून निवडणूक आयोगाच्या मनात गैरविश्वास जनतेत होऊ नये एवढंच आहे. त्यात राजकारण नाही. म्हणून मी सांगतो तसा ठराव करा. आम्ही ही माहिती राज्यसरकार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे देऊ. शक्य झालं तर मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. तर त्यांना सांगेल गावात या. लोकांचं म्हणणं ऐका. महिलांचं ऐका. शक्य असेल त्यांच्या मनातील शंका दूर करा. असं आम्ही सीएमला सांगणार. मुख्यमंत्री इकडे यायला आमची अडचण नाही, असं शरद पवार मारकडवाडीत म्हणालेत.

शरद पवार निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीवर काय म्हणाले?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी काल निवडणूक प्रक्रिया, आकडेवारी आणि निवडून आलेल्या आमदारांची संख्या यावरून काही प्रश्न उपस्थित केले. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं शरद पवारांनी काल म्हटलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शरद पवार यांच्या या आकडेवारीच्या विधानाला आकडेवारीने उत्तर दिलं.

शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उत्तर दिलं. आज शरद पवारांनी मारकडवाडीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केलेत.