काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत, असं पटोले म्हणालेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले आज सोलापुरात आहेत. तिथे ते बोलत होते. शाप देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे हे आम्ही पोथी पुराणात वाचले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे मटण खाणारे ब्राह्मण आहेत. यांच्या शाप लागत नाही, हे त्यांना देखील माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि आम्हीसोबत मटण खाललं आहे, असं नान पटोले म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी सोलापूरच्या प्रश्नांना हात घातला नाही. किंबहुना मागील वेळी दिलेल्या आश्वासनाबद्दल त्यांनी शब्दही काढला नाही. धर्माच्या आधारावर सुरू असलेली मोदींचे भाषण ऐकायला लोकांना कंटाळले आहेत. मोदींचं भाषण ऐकण्यासाठी लोकांना पैसे देऊन आणावे लागतात. तर राहुल गांधींचा सभेला लोक उन्हात उभा राहायला तयार आहे. या निवडणुका देशाच्या आहेत धर्माच्या नाहीत. आता सोलापुरात कोणतेही नेते आले तरी मोदीचे सरकार येणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
गृहखाते देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यांना महाराष्ट्रातील चित्र कळले आहे. बुथवर जेवढे मतदान झाले त्यावर दोन-तीन टक्के मतदान वाढवत आहेत. निवडणूक आयोगाने 70 C प्रमाणे आकडे असावेत. त्यांनी ती चूक करू नये अशी आमची भूमिका आहे, असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना मोदी मौनी बाबा म्हणायचे. इंडिया आघाडीचे सरकार देशात येईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील. नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. कर्नाटकचा प्रज्वल असो किंवा देशभरातले भ्रष्टाचारी हीच भाजपची ओळख आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.