मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांचं नकली भांडण; प्रकाश आंबेडकरांचं विधान

| Updated on: Jul 28, 2024 | 2:14 PM

Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil Devendra Fadnavis : प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भांडणावर भाष्य केलं आहे. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांमधील भांडणं नकली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांचं नकली भांडण; प्रकाश आंबेडकरांचं विधान
प्रकाश आंबेडकर, नेते वंचित
Follow us on

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसतात. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं नकली भांडण आहे जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. जरांगे यांच्या विरोधात कोणत्या देवेंद्र फडणवीस ओबीसींना वाटत आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे आहेत. मात्र ते भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे हे नकली भांडण आहे. ते पण ठरवून झालेलं भांडण आहे. ओबीसींना फसवण्यासाठी हे चालू आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

ठाकरेंना शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. राजकीय भूमिकेबाबत जे वास्तव आहे ते मी मांडलं आहे. मात्र त्यांनी आरक्षणाबाबत राजकीय भूमिका घेतली नाही. ती भूमिका मी मांडत आहे. उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान, मुख्यमंत्री व्हावेत. मात्र त्यांनी जरांगे पाटील यांच्या ज्वलंत मागणीवर बोलावं. महाराष्ट्रात शांत करावी यासाठी जनजागृती रॅली काढत आहोत. मराठा आणि कुणबी यांच राजकीय मतभेद मिटला असेल तर चांगला आहे. मात्र ते सामाजिक होऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

आरक्षणावर आंबेडकर काय म्हणाले?

उद्या राजकीय पक्ष म्हणून सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला त्याचे तोंड द्यावे लागणार आहे. राजकीय तोंड द्यायचा असेल तर जरांगे पाटलांच्या मागणीच्या बरोबर आहात की विरोधात आहात? हे स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे. हे सर्व राजकीय पक्ष ओबीसींच्या विरोधातले आहे. त्यामुळे ते पळवाटा काढत आहेत. राजकीय भूमिका घेतली तर लोकांना तो प्रश्न लवकर कळतो. आम्ही राजकीय भूमिका घेतली तर आमच्यावर ना ओबीसी नाराज आहे, ना मराठा समाज नाराज आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

आमची भूमिका प्रामाणिकपणाची आहे. जरांगेना पण भेटलो आणि हाकेही मी भेटायला गेलो होतो. जे आंदोलन करता त्या सर्वांना मी भेटत असतो. मात्र आंदोलकांना भेटल्यानंतर आमची भूमिका बदलते का किंवा नाही. हा काही इशू नाहीये. दोन ताटांची भूमिका आरक्षणाबाबत ही वंचितची संकल्पना आहे. ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना घुसवण्यात येऊ नये ही आमची भूमिका आहे. गरीब मराठ्यांना आरक्षणाचे वेगळे ताट घ्यावे. आर्थिक निकषावर जर आरक्षण द्यायचा असेल तर त्याचे नॉम्स तुम्हाला ठरवावे लागतात, असं आंबेडकर म्हणालेत.