सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मस्जिदमधून काही फतवे निघत असल्याचा दावा केला आहे. जिहादींना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता राहिलेली आहे. MIM ने उमेदवार दिलेला नाही. कारण काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत मशिदीमधून फतवे निघत आहेत. मात्र सातव्या विरोधात येथील समाज एक होईल आणि मोदीजींच्या पाठीशी उभा राहील. नरेंद्र मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मी त्याचा निषेध करतो, असं राम सातपुते म्हणाले. सोलापुरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा हे वक्तव्य केलं आहे.
संविधान वाचवण्यासाठी मोदीजींच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं. मशिदीतून फतवे काढून संविधानाला तुला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत. सोलापुरात मुलींना पाडण्यासाठी मौलवी फिरत आहेत. वेगवेगळे पत्रक काढले जात आहेत, असा दावा राम सातपुते यांनी केला आहे.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या मिरवणुकीत भाजपच्या राम सातपुतेंनी ठेका धरला. सोलापुरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची सांगता झाली. यावेळी उत्सव मिरवणुकीत भाजप उमेदवार राम सातपुते यांनी ठेका धरला. आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सर्वात मोठी मिरवणूक सोलापुरात निघते. या मिरवणुकीत लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी ठेका धरला.
राम सातपुते यांनी विविध जयंती उत्सव मंडळांना भेटी देत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी राम सातपुते यांनी आंबेडकर अनुयायांना जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केलं.
मराठा आरक्षण मुद्द्यावरही राम सातपुते यांनी भाष्य केलं. सोलापूर भाजप उमेदवार राम सातपुते यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संकल्प बोलून दाखवला. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही, असं राम सातपुते म्हणाले. अक्कलकोट भागामध्ये अवकाळी मुळे जे नुकसान झाले त्याबाबत प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.