सीमावाद काँग्रेसनं निर्माण केलेलं भूत, आता जाग कशी आली, सदाभाऊ खोत यांचा घणाघात

| Updated on: Dec 10, 2022 | 7:04 PM

काँग्रेसचे आमदार आणि खासदारसुद्धा कर्नाटकमध्ये आहेत. काँग्रेसचे आमदार आणि खासदार ही महाराष्ट्रामध्ये आहेत.

सीमावाद काँग्रेसनं निर्माण केलेलं भूत, आता जाग कशी आली, सदाभाऊ खोत यांचा घणाघात
सदाभाऊ खोत
Follow us on

सांगली : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा उफाळून आला आहे. खरं बघीतलं तर या सीमावाद हे काँग्रेसने निर्माण केलेलं भूत आहे. राज्यांमध्ये आणि देशांमध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त काँग्रेसला सत्ता उपभोगलेली आहे. या पन्नास वर्षांमध्ये सत्ता राज्यात तुमची होती, देशात होती. तुम्हाला हे भूत का काढता आलं नाही. ते भूत जिवंत ठेवण्याचे काम तुम्ही का केलं. आता या सगळा सीमावादाच्या तापलेल्या तव्यावरती राजकारणाची आपली पोळी भाजून घेता येईल का? अशा पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांची भूमिका आहे. अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.

सीमा भागातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे याबाबत कोणाचं दुमत असायचं कारण नाही. एका बाजूला न्यायालयीन लढा कसा भक्कमपणाने सुरू राहील. त्या ठिकाणी लवकरात लवकर सीमा भागातल्या जनतेला कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे.

परंतु ते न होता फक्त राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून सीमावाद दाखवला जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आव्हान करतो की, काँग्रेसचे आमदार आणि खासदारसुद्धा कर्नाटकमध्ये आहेत. काँग्रेसचे आमदार आणि खासदार ही महाराष्ट्रामध्ये आहेत.

ज्या विरोधी आघाडीचे नेतृत्व देशांमध्ये आदरनीय पवार साहेब करत आहेत. त्यांनी एक व्यापक बैठक कर्नाटकमधल्या काँग्रेस नेत्यांची बोलवावी. त्यात एक मुखी ठराव करावा. कर्नाटकमध्ये जो महाराष्ट्राचा भाग आहे. तो महाराष्ट्राला देण्यात यावा मग आम्ही समजेल ही खरी लढाई तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी लढत आहात, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

ते मात्र करायचं नाही. आणि हित मात्र बसल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेवरती कर्नाटकमध्ये अन्याय होतोय असं सांगायचं. अशी दुटप्पी भूमिका घेऊन जो गळा काढताय. हे कर्नाटकमधल्या महाराष्ट्रीयन जनतेला फसवण्याचा प्रकार आहे, असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला.

सभागृहामध्ये एखादा ठराव आला तर त्याला पाठिंबा भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षांनी आम्ही दिलेला आहे. महाराष्ट्रामधील मराठी माणसाची तिथं राहताय तो सगळा भाग महाराष्ट्राला जोडला गेला पाहिजे. ही भूमिका आमची सगळ्यांचे आहे.

देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळी तुम्ही काय अफूच्या गोळ्या खाऊन झोपलेला होता का आणि आताच तुम्हाला जाग आलेली आहे, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली.