आता एका लग्नाची ‘ही’ तिसरी गोष्टी, आधी विवाह, मग गुन्हा आणि नंतर थेट महिला आयोगाचाच बडगा…

| Updated on: Dec 05, 2022 | 12:40 AM

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या विवाहाबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सोलापूर अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

आता एका लग्नाची ही तिसरी गोष्टी, आधी विवाह, मग गुन्हा आणि नंतर थेट महिला आयोगाचाच बडगा...
Follow us on

मुंबईः कालपासून सोशल मीडियावर एका लग्नाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या रिंकी आणि पिंकी या दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाबरोबर विवाहगाठ बांधली आहे. त्यामुळे या लग्नाचे फोटो व्हिडीओ आणि जोरदार चर्चा होऊ लागली आहे. मात्र या लग्नाला दोन दिवस होण्याआधीच पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आहे. त्यामुळेही या लग्नाची आणखी जोरदार चर्चा होऊ लागली.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये झालेल्या या लग्नामुळे जनसामान्यांपासून ते अगदी आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगालाही याची दखल घ्यावी लागली आहे.

 

दोघी बहीणींनी विभक्त होण्याच्या भीतीमुळे एकाच मुलाबरोबर लग्न केले असले तरी हिंदू विवाह कायद्यानुसार एकाच व्यक्तीने दोन लग्नं करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

त्यामुळे दोघी बहिणींच्या एकाच नवऱ्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या विवाहाबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सोलापूर अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

रुपाली चाकणकर यांच्या या आदेशामुळे आता या दांपत्यावर काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या दोन जुळ्या बहिणीनी मुंबईतील एका मुलाबरोबर लग्न करण्याचा दोघींनी एकमेकींच्या समंतीने निर्णय घेतला खरा, पण हिंदू विवाह कायद्यानुसार हा गुन्हा असल्याने आता त्यांच्यावर गुन्हा नोंदही करण्यात आला आहे.

त्यानंतर थेट राज्य महिला आयोगाने कारवाईचा बडगा उगारत या लग्नाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सोलापूर पोलीस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.