बीड : भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी केलेल्या एका विधानाची आठवण त्यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना आठवण आलीय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गोपीनाथ मुंडे असतांना बंड पुकारत ते राष्ट्रवादीत गेले होते. त्यानंतर एकदा गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचं नातं कधीही तुटत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. अगदी तशीच प्रतिक्रिया नुकतीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीडमधील कारखान्याच्या बैठकीनंतर पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली होती. तर यावेळी बैठकीला जाणं टाळत चेअरमन यांना निवेदन देत धनंजय मुंडे माध्यमांशी बोलतांना समोर आलो असतो तर राजकारण घडलं असतं असे म्हणत पंकजा यांना कोपरखळी लगावली होती.
धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना राजकारणाची भाषा वापरल्याने पंकजा यांनीही पलटवार केला, त्यात त्यांना गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या विधानाची आठवण झाली.
रक्ताचं नातं कधीही तुटत नाही असं म्हणत बहीण-भावाचे नातं आजही कायम असल्याचे पंकजा यांच्या बोलण्यातून दिसून आले आहे.
नात्याबद्दल बोलत असतांना त्यांनी गोपीनाथ मुंडे हे का म्हणाले होते ? याच्याही पार्श्वभूमीचा दाखला देत मी कुणाशीही वैर बाळगत नाही असा खुलासा केला.
यावर पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर देतांना धनंजय मुंडे यांनी रक्ताचं नातं कधीही तुटत नाही हे मी यापूर्वी देखील म्हंटलो आहे असा दाखला दिला.
मात्र, नात्याचा खुलासा केला असला तरी आमची लढाई ही संपत्तीची नसून विचारांची आहे. त्यांचे राजकीय विचार वेगळे माझे वेगळे असून आम्ही राजकीय वैरी आहोत हे सांगायला धनंजय मुंडे विसरले नाहीत.
राजकारणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वैरी आहेत हे सर्वश्रुत आहेत. त्यांच्यातील संघर्ष आणि राजकीय भूमिकांवर नेहमीच राज्याचे लक्ष लागून असतं.
मात्र, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील बहीण0 भावाचे नाते आजही कायम आहे. त्याची प्रचिती अनेकदा आली आहे.
धनंजय मुंडे यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा पंकजा या सहकुटुंब हजर होत्या. तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या वेळीही धनंजय मुंडे सहकुटुंब हजर होते.
याशिवाय बऱ्याच सार्वजनिक कार्यक्रमात मुंडे बहीण भाऊ समोरासमोर येणे टाळत असतात, पण कधी आलेच तर टीका करण्याची संधी सोडत नाही आणि नात्याबाबत काळजी देखील घेतात.