मुंबई – उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मान्सून (Monsoon) केरळात (Kerala) दाखल झाला असून दोन दिवसात तो इतर राज्यात सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. देशात अनेक राज्यात सध्या ढगाळ वातावरण असून मान्सून पूर्व पाऊस पडत आहे. येत्या चोवीस तासात काही राज्ये मान्सून व्यापेल अशी शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) व्यक्त केली आहे. सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) देखील पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. पुढील 4 दिवस दक्षिण कोकण, दक्षित मध्य महाराष्ट्र , मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात 5 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Southwest Monsoon has set in over Kerala today, the 29th May , 2022 pic.twitter.com/H3mOkJB54s
हे सुद्धा वाचा— India Meteorological Department (@Indiametdept) May 29, 2022
मागच्या अनेक दिवसांपासून यावर्षी अधिक पाऊस पडेल असं भाकीत हवामान खात्याने वर्तविलं आहे. तसेच चांगला पाऊस होईल असंही सांगितलं आहे. यावर्षी मान्सून पाऊस वेळे आगोदर केरळमध्ये दाखल झाला आहे. तसेच तो आज अनेक राज्यात सक्रीय होण्याची शक्यता आहे. मान्सून पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्यास देशात सक्रीय व्हायला अधिक वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात काही दिवसांपासून पुर्णपणे ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस देखील झाला आहे.
यावेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचला आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की नैऋत्य मोसमी पाऊस ठरलेल्या वेळेपेक्षा तीन दिवस आधी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचला आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता.
मान्सूननंतर केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.