12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई : दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच बोर्डाचा निकाल (Result) जाहीर होणार आहे. पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात 30 तारखेपर्यंत पेपर तपासणीचं काम पुर्ण होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातील सूत्रांनी टीव्ही9 मराठीला दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. कारण, निकालांमुळे पुढील प्रवेश अडकतो. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचं नियोजन करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी निकाल लागणं गरजेच असतं. दरम्यान, दहावी-बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल.
दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी तयारी सुरु होते. दरम्यान , राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचं संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण विभागानं जाहीर केलंय. विद्यार्थ्यांना 17 मे पासून अर्ज भरता येणार आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती या पाच विभागांसाठी अकरावी प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही दोन टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते आणि त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोन मध्ये आवडीच्या कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरायचे असतात. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा यासंदर्भातील माहिती कळावी यासाठी 1 ते 14 मे या कालावधीत अर्ज भरण्याचा सराव झाल्यानंतर 17 मे पासून दहावीचा ऑनलाइन निकाल लागेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज भरता येणार आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. त्यामुळे येत्या जूनमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. अंतिम टप्प्यात 30 तारखेपर्यंत पेपर तपासणीचं काम पुर्ण होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातील सूत्रांनी टीव्ही9 मराठीला दिली आहे. दरम्यान, दहावी-बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी तयारी सुरु होते. निकाल न लागल्याने पुढील प्रवेश अडकतो. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचं नियोजन करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी निकाल लागणं गरजेच असतं.
इतर बातम्या
Nanded : बहारों फुल बरसाओ… लग्नसराईनं फुलांचाही रुबाब वाढला, कोरोनानंतर प्रथमच सुगीचे दिवस
मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता