संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल नाही करणार, महामंडळ काय म्हणालं?

| Updated on: Feb 22, 2022 | 3:00 PM

एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली.

संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल नाही करणार, महामंडळ काय म्हणालं?
एसटी कामगारांना विलीनिकरण सदृश्य लाभ मिळणार?; अनिल परब करणार उद्या घोषणा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : गेल्या 109 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Worker Strike) सुरु आहे. आज एसटीच्या विलीनीकरणावर कोर्टात () फैसला होणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून राज्य सरकारकडून अनेक आवाहनं (Hight Court) करूनही हे आंदोलन संपलं नव्हतं. शेवटी शेवटी तर खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यात उतरले मात्र तरीही काही कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणावर ठाम राहत संप सुरूच ठेवला. एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय येण्याच्या काही वेळ आधीच महामंडळाकडून एका महत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली. त्यामुळे निर्णय येण्याआधीच एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महामंडळाचे स्पष्टीकरण काय?

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे ही वस्तूस्थिती आहे. मात्र, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे वृत्त आज प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसूली नुकसान भरपाई कामगिरीवर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहिन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

संपामुळे महामंडळ, कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान

दरम्यान, संपामुळे सर्वसामन्य प्रवासी, ज्येष्ठ नागरीकांचे तसेच शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामगारांनी आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहनही चन्ने यांनी केले. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे त्याची भुर्दंड आणि त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक पगारवाढ करून सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र तरीही या आंदोलनावर तोडगा निघाला नव्हता. आता कोर्टाच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून असणार आहे. या संपामुळे एसटीचे तर नुकसान झालेच आहे. मात्र याची झळ अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बसली आहे. या संपामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबन अशा कारवाई करण्यात आल्या आहेत.

Video – Maha-Infa Conclave | टेडा सेंटरचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला; उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी सांगितलं लाभाचं गणित

2024 च्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच जाळं टाका, जयंत पाटलांनी आगामी निवडणुकांचा प्लॅन आखला

VIDEO | दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!