मुंबई : एसटी महामंडळाच्या ( MSRTC ) पाच बस स्थानकावर महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या सहकार्याने स्तनदा मातांसाठी पाच ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. मुंबई जिल्हा महिला व बालकल्याण समिती मार्फत ( mumbai central ) मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर वातानुकूलित ‘हिरकणी कक्षां’ची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे महिला प्रवाशांना त्यांच्या तान्ह्या बाळासाठी ‘फिडींग रूम’ ( baby feeding room ) उपलब्ध होणार आहे.
सार्वजनिक गर्दीच्या ठीकाणांवर उदाहरण रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने अडचणी होत आहेत. त्यामुळे राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने एसटी महामंडळाला एकूण 17 ठिकाणांवर ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा नियोजन समितीने मुंबई शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा एकूण 17 हिरकणी कक्ष मंजूर केले आहेत. या 17 हिरकणूी कक्षांपैकी एसटी महामंडळा्च्या पाच बस स्थानकापैकी मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर बस स्थानक या तीन बस स्थानकावर हिरकणी कक्षांची उभारणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.
मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर बसस्थानकांत प्रत्येकी 150 चौरस फूटांचे वातानुकूलित हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहीती एसटी महामंडळाची सूत्रांनी दिली आहे. तसेच एसटी महामंडळीच्या कुर्ला नेहरूनगर बस स्थानकातही हिरकणी कक्ष उभारण्यात येत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.