इचलकरंजीः सरकारने आम्हाला चौकात घेऊन फाशीची शिक्षा द्यावी, गोळ्या घालव्यात पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार कोल्हापूर (Kolahpur) जिल्ह्यातील इचलकरंजी आगारातील (Ichalkaranji Depot) कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या आगारातील सुमारे साडेचारशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही असा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) घेतला आहे. यावेळी सरकारने आम्हाला सात वेळा अल्टिमेटम दिला आहे तरीही आम्ही कामावर रुजू होणार नाही, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या तीन तिघाडी सरकारला येणाऱ्या भविष्य काळात आम्ही यांची जागा दाखवून देऊ. सरकारने आम्हाला चौकात घेऊन फाशीची शिक्षा द्यावी, गोळ्या घालाव्यात पण आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून कामावर हजर होण्याच्या दिलेल्या सूचना कर्मचाऱ्यांकडून पाळल्या जाणार नसल्याचेच चित्र स्पष्ट होत आहे.
महाविकास विकास आघाडीने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही कामावर हजर होणार नाही असा ठाम निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या होत असलेल्या आंदोलनानंतरही एसटी महामंडळात अकरा हजार कर्मचारी भरती करून घेत आहेत, त्यामुले त्यांनी आमचा थोडाफार तरी विचार करावा, आजची जी आमची अवस्था झाली आहे, त्याला हे सरकार जबाबदार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकाने एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्यानंतरही कर्मचारी हजर होऊ झाले नाहीत. याबद्दल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आजची जी आमची अवस्था आहे, ती या सरकारमुळे झाली आहे. सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, उद्धव ठाकरे, अजित पवार कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम देत आहेत तर अनिल परब हे कर्मचाऱ्यांना कामावर रुजू असल्याचे सागंत आहेत पण एकही मंत्रही आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, त्यामुळे त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असल्याचे मत एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची बदली? कृष्णप्रकाश यांच्याजागी विश्वास नांगरे पाटील येणार?