शिर्डीत साईनगरीत आता भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असतो. साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कुत्र्यांना डायबिटीजचा आजार झाला असल्याचे उघडकीस आलेले आहे.त्यामुळे या परिसरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खायला देऊ नका असे आवाहन भक्तांना करण्यात आले आहे.
शिर्डीतील साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे साईभक्तांची मोठी गर्दी होत असतानाही हे कुत्रे रस्त्यावर ठिकठिकाणी सुस्तपणे पडून असतात.त्यामुळे यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता या कुत्र्यांना चक्क डायबिटीज झाल्याचे उघडकीस आले आहे. साई मंदिरात आलेले भक्तमंडळी या कुत्र्यांना बुंदीचे लाडू, पेढे, बिस्कीट खायला देत असतात. मात्र, हा आहाराच कुत्र्यांच्या जीवावर बेतत आहे.
सतत गोड पदार्थांच्या सेवनाने साई मंदिर परिसरात भटकणाऱ्या कुत्र्यांना मधुमेह, सुस्ती, केसगळती आणि लठ्ठपणा अशा व्याधी जडल्याचे समोर आले आहे. साई मंदिराच्या दीड किलोमीटर परिघातील श्वान लठ्ठ झाले आहेत. त्यांचे वजन वाढल्याने हे श्वान कायम एका ठिकाणी सुस्तपणे पहुडल्याचे चित्र दिसत असते. याउलट दोन किलोमीटर परिघाबाहेरील श्वान मात्र तरतरीत असल्याचे उघड झाले आहे. हा विरोधाभास टळकपणे नरजेस आला आहे. मात्र सहज अन्न उपलब्ध होत असल्याने साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. साईभक्त किंवा शिर्डी ग्रामस्थांनी कुत्र्यांना गोडधोड खाऊ घालू नये असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी सुशील कोळपे यांनी केले आहे.