नाशिक : कुठल्या ना कुठल्या कारणावरून महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजेच लालपरी वादात सापडत असते. त्यातच आता नाशिक सीबीएसते इगतपुरीला जाणार बस चर्चेत आली आहे. एकतर आधीच नाशिकते इगतपुरीसाठी असणाऱ्या बसचा तुटवडा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि नोकरी निमित्ताने शहरात ये-जा करण्यासाठी या बस महत्वाच्या ठरतात. त्यातच चक्क बसमधील सीटच गायब असल्याचे समोर आले आहे. एसटी कर्मचारी, महिला आणि पत्रकार यांच्यासाठी राखीव असणारे सीट या बसमध्ये नसल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात असून लालपरीवर टीका होऊ लागली आहे. अगोदर या बसची अवस्थाही बिकट आहे. इंजिन पासून बसच्या साठयाचा आवाज येऊ लागला आहे. त्यामुळे नाशिकमधील बसच्या परिस्थितीवर सोशल मीडियावर देखील टीका होऊ लागली आहे.
नाशिक ते इगतपुरी प्रवास करणारी एसटी महामंडळाच्या बसमधील तीन सीट गायब झाल्याचा व्हीडीओ शेयर झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे.
एसटी सेवेवर आधीच टीकेची झोड उठत असतांना असे व्हीडीओ शेयर झाले तरी प्रशासन धिम्म आहेत, याबाबत अद्यापही कुठलीही थोड कारवाई केली गेली नाहीये.
नाशिक ते इगतपुरी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एसटी बसची संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे, त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
एसटी प्रशासनाचा हा गलथान कारभार प्रवाशांच्या जिवावर देखील बेतू शकतो त्यामुळे नाशिक ते इगतपुरी असा प्रवास करणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बस क्रमांक एमएच 07 सी 9140 ही एसटी जवळपास कालबाह्य झाली असावी अशी नागरिकांना शंका आहे, त्यातच तीची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने नागरिक एसटी बदलून देण्याची मागणी करत आहे.
50 ते 55 आसन क्षमता असलेल्या बसमध्ये दररोज 80 च्या वर प्रवासी प्रवास करत आहे, त्यामुळे हा प्रवास जिवावर बेतण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.