नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते, Sudhir Mungantiwar असं का म्हणाले?

| Updated on: Mar 20, 2022 | 4:13 PM

सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 देऊन मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.

नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते, Sudhir Mungantiwar असं का म्हणाले?
नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते, Sudhir Mungantiwar असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांचा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 देऊन मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईत (mumbai) हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी गडकरींची तोंडभरून स्तुती केली. नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते आहेत.राजनीती नाही तर समाजनीतीच राजकारण ते करतात. त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला हे सौभाग्य आहे, असं उद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी काढलं. पुरस्कारावर विश्वास नव्हता. पण आपलं काम पोहोचलं पाहिजे. म्हणून यावेळी इथे आलो असं सांगत मुनगंटीवार यांनी यावेळी सीएसआर कंपन्यांचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ आणि वन खातं होतं. यावेळी त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली होती. विशेष म्हणजे त्यांनी वृक्षरोपणाचा धडका लावला होता. तसेच वृक्षरोपण करणाऱ्या संस्था, संघटनांनाही प्रोत्साहित करण्याचं काम केलं होतं. त्याचीच दखल घेऊन मुनगंटीवार यांना सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 देऊन गौरवण्यात आलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला.

सामाजिक दायित्व महत्त्वाचे

देशातील विविध लोकोपयोगी सामाजिक प्रकल्प राबविण्यात कॉर्पोरेट्स आपल्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून मोठे योगदान देत आहेत. काही कॉर्पोरेट्स कायद्यातील अनिवार्य तरतुदींना अनुसरून सामाजिक कार्यांसाठी योगदान देतात, मात्र अनेक संस्था त्याही पलीकडे जाऊन स्वखुशीने अधिक योगदान देतात. समाजाच्या विकासासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्वापेक्षा देखील नागरिकांचे स्वतःचे सामाजिक दायित्व अधिक महत्वाचे आहे असे सांगून समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन निःस्वार्थपणे समर्पित करणाऱ्या देवतुल्य व्यक्तींचा देखील सन्मान करण्यात यावा, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केली. करोना संसर्गाच्या काळात केवळ कॉर्पोरेट्स व मोठ्या संस्थांनीच नाही तर सामन्यात सामान्य व्यक्तीने देखील चांगले कामे केले असे सांगून राज्यपालांनी सर्व विजेत्या संस्थांचे अभिनंदन केले.

 

संबंधित बातम्या:

Devendra Fadnavis : मी ठरवलं की नंबर 1 येतोच, फडणवीसांचं पुन्हा आघाडीला आव्हान, 3 मार्कशीट जूळवून पहिले आल्याचाही टोला

माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना राज्यपालांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मोबाइल आणि लॅपटॉप चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, Pune rural पोलिसांची कारवाई