भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आतापर्यंत तीन वेळा फुटली. व्यक्तिगत मालकीची सेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वतःच नाव देण्याची गरज काय? शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पक्ष मालकी हक्काचे पक्ष झाले आहेत. दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांचे पक्ष राहिला नाहीत. त्यामुळे ज्यांना पटत नाहीत ते बाहेर पडणारच…, असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते पालघरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
दोन्ही पक्षात शिल्लक राहिलेल्या आमदारांना नरेंद्र मोदींवर केलेली टीका आवडत नाही. सत्ता येणार असल्याचा साक्षात्कार झाल्याने अहंकार आणि घमेंड यांना आली आहे. त्यामुळे जेल मध्ये टाकण्या वलग्ना केल्या जात आहेत. रावणासारखी घमंड आली आहे. यांची सत्ता येणार नाही. किमान चार जून नंतर तरी सत्ता येणार असं तरी म्हणायला हवं होतं, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
लाल चौकात भारताचा झेंडा जाळला जात असताना काँग्रेसचे पंतप्रधान तोंडाला फेविकॉल चिकटवल्यासारखे शांत बसायचे. परंतु आता मोठ्या दिमाखात तिरंगा लाल चौकात फडकत आहे. शरद पवारांना त्यांची सुकन्या सुप्रिया सुळे , उद्धव ठाकरे यांना आदित्यची तर सोनिया गांधींना राहुल गांधींची चिंता आहे. परंतु नरेंद्र मोदी फक्त आणि फक्त देशाच्या नागरिकांची चिंता आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत,वैफल्यग्रस्त झाल्याने आशा द्धतीचे वक्तव्य केली जात आहेत. मोदी प्रधानमंत्री बनणार नाहीत अशी वक्तव्ये करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेत आहेत. परंतु ते खोटं समाधान आहे. 20 जागांवर लढणारे ठाकरे आणि दहा जागांवर लढणारे शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील का? असा सवाल इंडिया आघाडीत अस्थिरता आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे.