शिर्डी : राज्यात सध्या पुन्हा मोठा राजकीय (Bjp Vs Shivsena) वाद सुरू झालं आहे. राज्यात सध्या सुडनाट्य , गुंडाराज सुरू आहे. संविधानाचा सन्मान टिकवण्याऐवजी संविधान आणि लोकशाहीला बोट लागेल अशी कृती होते. मात्र जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या शक्तीच्या आधारावर सर्व भोगाव लागतं असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटलंय. ते शिर्डीत बोलत होते, कार्यकर्मानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर (Cm Uddhav Thackeray) सडकून टिका केली आहे. या राज्यात भाजपच्या अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले.बेईमानाच्या आधारावर जन्माला आलेल सरकार आपल्या बेईमानीचा पिच्छा सोडायला तयार नाही. त्यावेळी छगन भुजबळांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली. आणि भुजबळांना व्याजासकट अडीच वर्ष जेल मध्ये जावं लागलं. शेवटी नियती आपलं व्याज वापस करते असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त करत ठाकरे सरकारला सूचक इशारा दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलय कधीही बॅक डोअर एंट्री करू नका. मोदी देखील राज्यसभेतून येऊ शकले असते, मात्र ते जनतेतून निवडून आले. बॅक डोअर एंट्री करणाऱ्यांना फक्त षडयंत्री राजकारण समजत.जनतेतून निवडून न आल्याने जनतेच्या समस्या त्यांचे प्रश्न काय ? लोकहीत काय यापेक्षा फक्त स्वार्थाचा बाजार कसा करायचा हे त्यांना समजत.हे दुर्देवी आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रपती राजवट लावेल असे त्यांना वाटत असेल मात्र भाजप दुसऱ्या मार्गाने राष्ट्रपती राजवट लावणार नाही असे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगीतलं.
वंदे मातरम , भारत माता तसेच पंतप्रधानांसंदर्भात अपशब्द वापरणे हा राजद्रोह नाही. मात्र हनुमान चालिसाचे पठण करणे हा राजद्रोह ठरत आहे.कसे हिंदुत्व वादी बेगडी आहे. ते या उदाहरणावरून दिसत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तुम्ही हनुमान चालिसा म्हणणार असाल तर हे देशातील सर्वात अपवित्र कार्य , हा राजद्रोह परंतु वंदे मातरम , भारत माता की जय न म्हणणारे हे तर मांडीवर बसले पाहिजेत. यांच्याच मतावर सत्तेचं दुकान चालतं.परिवारात पात्रता नसताना मोठ्या पदावर जाता येत.ज्यांना वाईट कृती करायची त्यांनी करावी. न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास असून अपिलात राणा दांम्प्त्याचा विजय नक्की होईल असं माझ मत आहे, असेही ते म्हणाले आहेत.
तसेच संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कधी कधी वाटतं त्यांचाच शिवसेनेवर काही राग असेल , शिवसेना संपवण्याचा विडा त्यांनी उचलला असेल. राहुल गांधीनी मात्र काँग्रेस संपण्याचा निश्चित तो संकल्प केलाय. 20 राज्यात कॉग्रेस नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्या दिवशी आम्ही काँग्रेस सोबत जावू त्या दिवशी शिवसनेच दुकान मी बंद करेल.ते स्वप्न संजय राऊंतांना कदाचित पुर्ण करायचे असेल. साईचरणी एवढीच प्रार्थना करेल की ते स्वप्न राऊतांचे हस्ते पुर्ण होईल असा मिश्किल टोला मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना लगावलाय.