राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. हा शपथविधी कधी होणार? यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच अमित शाह यांच्यासोबत अजित पवारांची बैठक होऊ शकते, असे संकेतही तटकरेंनी दिले आहेत. अमित शाह चंदिगडमध्ये आहेत. आम्ही रात्री सगळे राजकीय चर्चा करू शकतो. ते काय होतय ते आम्ही बोलू. संघटनाबाबत आमची रात्री सविस्तर चर्चा झाली. अमित शाह यांच्यासोबत काही चर्चा करू. येत्या 5 तारखेला शपथविधी आहे, असं सुनिल तटकरे म्हणालेत.
मंत्रिपदाबाबत आम्ही जेव्हा चर्चेला बसू तेव्हा आकडा किती यावर चर्चा करू. लोकसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या. धाराशिव जागा आमची इच्छा नसताना लढावी लागली. विधानसभेला अधिक जागा मिळाव्यात ही आमची भूमिका होती. मात्र त्यावेळी देखील कमी मिळाल्या. आमच्यात उत्तम समन्वय होता. बूथ लेव्हल्पर्यंत आमचा समन्वय होता. आम्हाला विधानसभेला चांगल यश मिळालं होतं, असं सुनिल तटकरे म्हणालेत.
एकनाथ शिंदे यांना योग्य तो मानसन्मान दिला जातोय. युतीमध्ये सर्वांना सन्मान आहे. सन्मानपूर्वक वागवलं जातं आहे. अजितदादा पवार, अमित शाह यांच्या भेटीसाठी पूर्वनियोजित आलेले नाहीत. कोणाच्या सुपिक डोक्यातून हे वृत्त निघालेलं हे माहीत नाही… दादा वेटिंगवर आहेत हे चुकीचं आहे, असंही तटकरेंनी म्हटलं आहे.
महायुती सरकारचा शपथविधी हा मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी जात चंद्रशेखर बावनकुळेंनी पाहणी केली. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीत तिन्ही पक्ष एकत्र आहेत. जर आम्हाला सांगितलं असतं की पाहणी करायला चला तर आम्ही गेलो असतो, असं म्हणत केसरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर तटकरेंनी प्रतिक्रिया दिलीय. केसरकर यांनी व्यक्त केलेली गोष्ट रास्त असू शकते. आज सगळे नेते एकत्र पाहणी करतील. आज आमच्याही पक्षाचे नेते धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील पाहणीसाठी जातील. हसन मुश्रीफ मुंबईत असतील तर तेही जातील, असं सुनिल तटकरे म्हणालेत.