उदयनराजे ‘राजे’ आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांची टोलेबाजी…भिरकन राजीनामा फेकतील असं सुषमा अंधारे का म्हणाल्या…

| Updated on: Dec 13, 2022 | 3:46 PM

तडकाफडकी ते लगेच राजीनामा द्यायला दिल्लीला गेले असतील, आम्ही चांगला विचार करणारे लोकं आहोत, उदयन राजे यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहेत.

उदयनराजे राजे आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांची टोलेबाजी...भिरकन राजीनामा फेकतील असं सुषमा अंधारे का म्हणाल्या...
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी आज पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. याबंदमध्ये विविध नेत्यांनी बंदच्या भाषणात फटकेबाजी केली. पण यावेळी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केलेली फटकेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उदयनराजे यांच्याच राजीनाम्यावर भाष्य करत टोलेबाजी केली आहे. भाजपला खडेबोल सुनावत देवेंद्र फडणीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, नितेश राणे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाड लाड आणि राम कदम यांचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. याच दरम्यान उदयनराजे यांची स्तुती करत सुषमा अंधारे यांनी थेट उदयनराजे यांना टोला लगावला आहे. महापुरुषांचा अवमान झाल्याने उदयनराजे यांनी बंदला पाठिंबा दिल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.

सुषमा अंधारे यांनी थेट उदयनराजे यांनी इथे व्यासपीठावर उपस्थित राहायला पाहिजे होते, त्यांना आम्हाला काय विचारायचे होते, त्यांचेही आपण ऐकलं असतं असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे आपल्यासोबत हार घालायला होते, त्यामुळे ते व्यासपीठावर निषेध नोंदवायला इथे येतील. आणि आम्ही त्यांच्या समोर बोलू शकू.

त्यांना आम्ही काही सांगू ते आम्हाला काहीतरी ऐकवतील असं वाटलं होतं, पण ते नाहीत, कदाचित त्यांना महापुरुषांचा झालेला अवमान सहन झाला नसेल आणि ते राजीनामा द्यायला गेले असतील.

तडकाफडकी ते लगेच राजीनामा द्यायला दिल्लीला गेले असतील, आम्ही चांगला विचार करणारे लोकं आहोत, उदयन राजे यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहेत,

ज्या अर्थी ते इथे हार घालायला आले होते, त्या अर्थी महापुरुषांच्या सन्मानासाठी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा सुद्धा देतील, असा भिरकन राजीनामा फेकतील, राजे म्हणजे पाच हजार दहा हजारावर मनसबदारी करणारे नव्हे, उदयनराजे राजे आहेत, मनाचे राजे आहेत.

अशी टोलेबाजी सुषमा अंधारे यांनी केल्यावर बंदमध्ये सहभागी झालेल्या पुणेकरांनी जोरदार टाळ्या वाजवल्या, त्यामुळे बंदमध्ये थेट उदयनराजे यांच्याच राजीनाम्यावर भाष्य करून सुषमा अंधारे यांनी केलेली टोलेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे.