सिंधुदुर्गः ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रवास करत आहेत. त्यातच या महाप्रबोधन यात्रेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सभेा संबोधित करतात. त्यावेळी मात्र सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी अब्दुल सत्तार, नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला जातो आहे. आजही सिंधुदुर्गात महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला. नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका करुन त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला.
आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, दीपकभाऊ खूप चतुर कावळा, गोडबोल्या आणि साखर झेल्या असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. गोड गोड बोलणाऱ्यांच्या चेहऱ्यांच्या पाठीमागे क्रूर चेहरा असतो असाही हल्लाबोल त्यांनी त्यांच्यावर केला.
महाप्रबोधन यात्रेत भाषण सुरु झाल्यापासून त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर जोरदार टीका करण्यात आली. या सभेत त्यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना विधानसभेतील त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील झालेल्या संवादाचा व्हिडीओ लावूनच त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
काँग्रेसमधून नारायण राणे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी फक्त भुंकायचंच काम दिले आहे अशी जहरी टीका त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपचे आता पुन्हा युद्ध रंगणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
नारायण राणे, दीपक केसरकर यांच्याबरोबरच त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याबद्दल बोलताना सांगितले हे जेव्हा काहीही बोलतात त्यावेळी या भाजपची संवेदनशीलता कुठे जाते असा सवालही त्यांनी यावेळी केला.
राणे पितापुत्र जेव्हा महिलांबद्दल वाईट बोलतात त्यावेळी भाजपला हे दिसत नाही का असा सवल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी भाजपच्या सूडाच्या राजकारणावरही टिप्पणी केली. त्या म्हणाल्या की, भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन, ईडी आणि सीबीआयचा वापर करून ज्या प्रकारे विरोधकांना संपावयाच विचार करत आहे त्यावरून त्यांची नियत कळते अशी जोरदार टीका त्यांनी भाजपवरही केली आहे.