कुडकूडणाऱ्या बालकांना मिळाली मायेची ऊब, खाकी वर्दीच्या पलीकडील माणुसकीचं दर्शन

| Updated on: Jan 07, 2023 | 4:15 PM

असे अनेक लोक असतात, जे इतरांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात.काही लोक तर आपले काम करताना माणुसकीचे कर्तव्य बजावायला विसरत नाहीत. याचा प्रत्यय नाशिकमध्ये आल्या आहेत.

कुडकूडणाऱ्या बालकांना मिळाली मायेची ऊब, खाकी वर्दीच्या पलीकडील माणुसकीचं दर्शन
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्यात रक्त गोठवणारी थंडी पडू लागली आहे. काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीने काहींचा जीवही गेला आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात निफाड-सायखेडा परिसरातही कडाक्याची थंडी आहे. याच थंडीत ऊसतोड कामगार भल्या पहाटे उसतोडीसाठी जात असतात. जिथे राहण्याच्या व्यवस्था असते तिथेच त्यांच्या लहान-सहान लेकरांना सोडून जात असतात. थंडीचा जोर अधिकच असल्याने शेकोटी पेटवून थंडीपासूनचा बचाव करीत असतात. पण याच काळात गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पी वाय कादरी यांना हे चित्र दिसले होते. त्याच वेळी मनाशी खूणगाठ बांधत या लेकरांना मदत करायचे त्यांनी ठरविले होते.

असे अनेक लोक असतात, जे इतरांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात.काही लोक तर आपले काम करताना माणुसकीचे कर्तव्य बजावायला विसरत नाहीत.

गोदाकाठ भागातील शिंगवे फाटा परिसरात हे दर्शन घडून आलंय. एक पोलीस अधिकारी असलेल्या पी वाय कादरी यांच्या निमित्ताने.

हे सुद्धा वाचा

ऊसतोड कामगारांच्या मुलांचे थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून मदतीचा विडा उचलला आहे. इतरांनीही या कामात सहभागी व्हावे, म्हणून ते आवाहन करत आहे.

पंचक्रोशीत या पोलीस अधिकाऱ्याचे नागरिक कौतुक करत आहे. पेट्रोलिंगच्या गाडीतच त्यांनी उबदार कपडे ठेवली आहेत. जिथे ही ऊसतोड कामगारांची लेकरं दिसतील त्यांना ते कपडे देत आहे.

त्यांच्या या मदतीला त्यांचे सहकारी असलेले पोलीस कर्मचारीही सहभागी झाले आहे. जिथे-जिथे ऊसतोड मंजूर आहेत त्यांच्या मुलांना ते शॉल, उबदार कपडे देऊन माणुसकी जपली आहे.

गोदाकाठ भागात गारठलेले ऊसतोड कामगारांचे संसार सावरण्यासाठी मदतीच्या ऊबदार हातांची गरज आहे, आपण ही शक्य तितकी मदत कराल अशी अपेक्षा सायखेडा पोलीस व्यक्त करत आहे.