अकोला: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ते धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात प्रचंड गदारोळ उठला. सत्ताधाऱ्यांकडून आणि हिंदू संघटनांकडून अजित पवारांविरोधात जोरदार आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले.
त्यानंतर आज हिंदू समाजाच्या मोर्चाप्रसंगी भाजपचे नेते टी. राजा यांनी अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.
टी. राजा यांनी टीका करताच ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिठकरी यांनीही त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. टी राजाला भर चौकात नागडं करून फटके मारा अशी जोरदार त्यांच्यावर टीका केली आहे.
आमदार अमोल मिठकरी यांनी भाजपच्या टी राजा यांच्यावर टीका करताना हा कसला टी राजा, हा तर कपटी राजा असल्याची टीका केली आहे.
जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. त्यावेळी टी राजांचे हिंदुत्व कुठे गेला होते. असा सवाल अमोल मिठकरी यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टी राजा यांनी केलेली असताना अमोल मिठकरी म्हणाले की, दुसऱ्याला पुरुषार्थ शिकवण्यामध्ये किती पुरुषार्थ आहे असा सवाल त्यांनी केला आहे. तेलंगानाहून आलेला हा भाजपचा आमदार भाजपने सोडलेलं एक पिल्लू आहे. तेलंगणाचा आमदार या महाराष्ट्रात येतो आणि महामानवांच्या विरोधात बोलतो.
त्यामुळे याला कुठे अक्कल असल्याची सडकून टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात अशी वृत्ती वाढू देऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली। आज राज्यामध्ये त्यांचा सरकार असताना मोर्चा काढण्यात येत आहे.
म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी गत सध्या भाजपची झाली आहे अशी टीका अमोल मिठकरी यांनी भाजपवर केली आहे.
त्यामुळे या कपटी राजाला आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल टी राजाला भर चौकात नागडं करून फटके मारायला पाहिजे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.