चंद्रपूर : चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकरणात पर्यटकांची ऑनलाईन बुकिंग एजन्सीने तब्बल साडेबारा कोटींची घोटाळा केला होता. त्यानंतर एजन्सीविरोधात गुन्हे दाखल झाले होते. चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन असं फसवणुक केलेल्या एजन्सीचं नाव होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन बुकिंग सेवा बंद होती. आरोपी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन एजन्सीसोबतचा ताडोबा व्यवस्थापनाने रद्द केला होता. त्यानंतर एजन्सीने हाय कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणावर कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंगसाठी न्यायालयाने परवानगी आहे. नवी बुकिंग वेबसाईट 4 दिवसात चालू होणार आहे. ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा आहे.
चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या एजन्सीने या एजन्सीने सुमारे 12 कोटी 15 लाख 50 हजार रूपयांची ताडोबा व्यवस्थापनाची फसवणूक केलेली. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने त्यांच्यासोबतचा करार रद्द केलेला. त्यानंतर एजन्सीवाल्यांनी 2026 पर्यंत करारनामा असताना ताडोबा व्यवस्थापनाने अचानक करार रद्द केल्याचे सांगत एजेन्सी ने चंद्रपूर न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने यावर सुनावणी करत ताडोबाच्या बुकिंग प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ताडोबाची बुकिंग प्रक्रिया ठप्प होती. मात्र आज चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने ही स्थगिती उठवत ताडोबाला बुकिंगसाठी परवानगी दिली. येत्या 4-5 दिवसात ताडोबाची अधिकृत बुकिंग साईट सुरु होण्याची शक्यता आहे. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी असून आता काहीच दिवसात ऑनलाईन बुकिंग करत ताडोबा व्याघ्र पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.