मुख्यमंत्र्याचा ताफा शिर्डीहून अचानक कुठे गेला? शिंदेंनी सरकारचं की आपलं भविष्य पाहिलं ? चर्चेला उधाण

| Updated on: Nov 24, 2022 | 10:47 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते, शिर्डी येथील दर्शन आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक सिन्नरकडे वळाला होता.

मुख्यमंत्र्याचा ताफा शिर्डीहून अचानक कुठे गेला? शिंदेंनी सरकारचं की आपलं भविष्य पाहिलं ? चर्चेला उधाण
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे दर्शनाला आलेले असतांना अचानक ताफा सिन्नरकडे वळविल्याने चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर अचानक नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या मिरगावच्या श्री इशानेश्वर मंदिरात गेले होते. यावेळी शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेतले, त्यादरम्यान त्यांनी अभिषेक करत पूजाही केली. यावेळी मुख्यमंत्री यांच्या सोबत मंत्रीमंडळातील मंत्रीही उपस्थित होते. दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ दर्शनासाठी आलेले नव्हते तर भविष्य पाहण्यासाठी देखील आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यंत्रणेला कुठलीही कल्पना नसतांना अचानक ताफा शिर्डीहून सिन्नरकडे वळविल्याने दबक्या आवाजात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते, शिर्डी येथील दर्शन आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक सिन्नरकडे वळाला होता.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी, मंत्री दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील होते.

हे सुद्धा वाचा

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील श्री ईशान्येश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्री यांनी भविष्य पाहिले का ? याची चर्चा सुरू झाली आहे.

त्याचे कारण म्हणजे श्री ईशान्येश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात हे अंकशास्राचे अभ्यासक आहेत, त्यांचे भविष्य पाहण्यासाठी मोठी गर्दी असते.

खरात यांच्याकडे विविध क्षेत्रातील मंडळी येत असतात त्यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रिटी, व्यापारी आणि उद्योजक मार्गदर्शनाकरिता येतात.

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनीही खरात यांच्याकडे जाऊन सरकारचं आणि स्वतःचे भविष्य पाहिले असावे अशी चर्चा होऊ लागली आहे.

मात्र, याविषयी देवस्थान आणि मुख्यमंत्री यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, देवस्थानचे विश्वस्त मात्र दर्शनासाठी आले होते, राज्यावर आलेली संकटे दूर होऊदे अशी प्रार्थना त्यांनी केल्याची माहिती देत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिन्नर दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून सिन्नरच्या रस्त्याला लागे पर्यन्त दौऱ्याबाबत कुणालाही कल्पना देण्यात आलेली नव्हती.

याच चर्चेत आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उडी घेतली असून त्यांनी निषेध करत हे जर खरं असेल तर ते अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हंटले आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचं, मुख्यमंत्र्यांचं वर्तन अत्यंत बेजबाबदार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी म्हंटले आहे.