चंद्रपूर : मोबाईल हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या मोबाईल वापराचे अनेक तोटे आणि दुष्परिणामही दिसून येत आहेत. 5 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मोबाईल बोलण्याच्या नादात एका शिक्षकाने आपला जीव गमावल्याची घटना मूल शहरातील पंचशील नगर भागात घडली आहे. चिरकुटा खोब्रागडे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. खोब्रागडे हे रात्री कानात हेडफोन लावून मोबाईलवर चालत असताना रेल्वेचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त होतेय. (teacher died in the city of Chandrapur after being hit by a train while talking on a mobile phone)
चिरकुटा खोब्रागडे हे रात्री जेवण झाल्यानंतर घराशेजारी असलेल्या रेल्वे रुळावर फिरायला गेले होते. कानात हेडफोन असल्यामुळे त्यांना रेल्वेचा आवाज आला नाही. गोंदियाकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत खोब्रागडे हे दूर फेकले गेले. त्यावेळी त्यांचा जागीत मृत्यू झालाय. खोब्रागडे हे मूल तालुक्यात उथळपेठ इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. शिक्षक दिनीच एका शिक्षकाचा मृत्यू झाल्यानं मूल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जुलै महिन्यात बल्लारपूर शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला होता. कर्करोगाने त्रस्त असलेल्या पत्नीची काळजी घेण्यावरून सुनेशी भांडण झाले. त्या भांडणातून आरोपीने आधी सुनेची हत्या केली. नंतर आपण तुरुंगात गेल्यावर पत्नीची काळजी कोण घेणार, या चिंतेतून तिलाही संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्याकांडानंतर आरोपी स्वतःहून बल्लारपूर पोलीस ठाण्यात शरण आला होता.
शहरातील शिवाजी वार्डात राहणाऱ्या काजल डे (वय 58) यांची पत्नी आशा ही कर्करोगाने पीडित होती. दीर्घकाळ रूग्णालयात राहिल्यानंतर ती नुकतीच घरी परतली होती. डायलिसिसवर असलेल्या पत्नीची सून प्रियंका ही व्यवस्थित देखभाल करत नसल्याने घरात अधूनमधून वाद होत होते. घटना घडली त्या दिवशी आरोपी काजल आपले काम आटोपून घरी आला होता. त्यावेळी त्याने आजारी पत्नीला जेवण दिले का? अशी विचारणा सुनेला केली. त्यावर “वेळ मिळेल तेव्हा देईन” असे उत्तर सुनेने दिले. त्यावरून आरोपी आणि त्याच्या सुनेमध्ये भांडणाला सुरुवात झाली. हे भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजल याने सुन प्रियंका हिचा गळा आवळून खून केला.
किरकोळ वादातून दोन महिलांचे प्राण गेले. रागाच्या भरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसर, जिल्ह्यातील नागरिकांसह पोलिसही सुन्न झाले होते. आरोपीने आजारी पत्नीला तिच्या देखभालीच्या काळजीतून संपवल्याचे उघडकीस आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.
इतर बातम्या :
अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी, भाजप प्रवक्त्यांचं आव्हान
अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने 100 कोटी रुपये द्या, नरेंद्र पाटलांची मागणी
teacher died in the city of Chandrapur after being hit by a train while talking on a mobile phone