मुंबई : तेजस ठाकरे नावाप्रमाणेच तेजस आहेत, ते जे काही करतात त्याला हॅट्स ऑफ, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी तेजस ठाकरेंचं कौतुक केलंय. त्या मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. ठाकरे घराणे हे बाळासाहेबांच्या आशीर्वादानं चालतंय. उद्धव ठाकरेंच्या पोटी दोन सुपुत्र आहेत. तेजस ठाकरे दैवी कथांवर जो काही अभ्यास करतात, जे काही संशोधन करतात हे खरंच हॅट्स ऑफ असल्याचंही महापौर किशोरी पेडणेकरांनी अधोरेखित केले.
तेजस ठाकरे राजकारणात येणार का असे म्हणण्यापेक्षा ते आधीपासूनच राजकारणात आहेत, पण त्यांच्याबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेतील. तेजस ठाकरे हे आक्रमक फलंदाज आहेत, ते करत असलेल्या कामामध्ये त्यांची आक्रमकता दिसते. पण तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असंही किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.
उद्धव ठाकरे हे नेहमी नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेतात. आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांनीही फूल प्रूफ काम केलं. वयाच्या 16-17 व्या वर्षी येऊन सेनेच्या निवडणुका जिंकून आणल्यात. त्यामुळे ठाकरे घराण्यांमधलं असलेलं कर्तृत्व हे हळूवारपणे दिसत जातंय. आदित्य ठाकरे काम करत आहेत, म्हणून आमच्याकडे डबल हॉर्स पॉवर आहे, असंही त्या म्हणाल्या.
आम्हाला आता निवडणुकांची तयारी करावीच लागत नाही. निवडणुका आम्ही कधीही हलक्यानं घेत नाही, निवडणुका हे नेहमी संग्राम असते, युद्ध असल्यामुळे तयारी असणारच आहे. त्यामुळे कोणीही अस्वस्थ होण्याची गरज नसल्याचंही मुंबईच्या महापौरांनी सांगितलं.
आपण तर 24 तास देऊ शकतो, इतकी आपल्याकडे मॅन पावर आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे पाहिजे तेवढा लसीचा साठा उपलब्ध नाही. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. प्रत्येकाला नियम पाळायला सांगतोय, जास्तीत जास्त गर्दी होत असली तरी स्वतःला सावरा. थोडं अजूनही जपायला हवे, असं केंद्रातील आरोग्य मंत्रालयानंही सांगितलंय. त्यामुळे मुख्यमंत्री कोणीही दबाव टाकला तरी लवकर सगळं काही उघडणार नाहीत, असंही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या
तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक
Tejas as the name Tejas Thackeray, hats off to for everything he does says Kishori Pednekar