बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक वाद दिवसेंदिवस आता वाढतच चालला आहे. काल कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय संघटनांनीही जशास तसे उत्तर देत कर्नाटकातील वाहनांना काळे फासले होते. त्यामुले आता हा वाद प्रचंड वाढला असून आता दोन्ही राज्यातील बससेवेवर याचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बस पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत.
कालच्या वाहनाच्या तोडफोडीनंतर आता कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हिम्मत असेल तर बेळगावमध्ये येऊन दाखवा असा इशारा महाराष्ट्रातील राजकारण्यांना दिला आहे.
तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीमाभागाती नागरिकांवर, प्रवाशांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केल्यानंतर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले.
कालच्या या घटनेनंतर आज सीमाभागात ये-जा करणाऱ्या बससेवेवर परिणाम होऊन या भागातील बससेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
त्याचा परिणाम जनसामान्य लोकांवर झाला असून बससेवा बंद असल्यामुळे सीमाभागातील लोकांना आता पायपीठ करावी लागत आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या काही समस्या असती बेळगाव, निपाणी या शहरांचा आधार आहे. मात्र आता बससेवा बंद असल्यामुळे त्याचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे. रुग्णांना तात्काळा आरोग्य सुविधा मिळणेही अवघड झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चालू झालेला हा सीमावाद आता कधी मिठणार असा सवाल सीमाभागातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.