‘मुंबई’ टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याची भीती, पोलीस अलर्ट मोडवर

| Updated on: Sep 28, 2024 | 3:00 PM

दहशतवादी मुंबईला लक्ष करण्याचा धोका असून या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आले असून काल दिवसभर मुंबईत पोलिसांकडून ठिकठिकाणी झाडझडती घेण्यात आली.

मुंबई टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याची भीती, पोलीस अलर्ट मोडवर
मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Follow us on

दहशतवादी मुंबईला लक्ष करणार असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणांकडून मिळाल्याने मुंबई पोलीस एकदम अलर्ट मोडवर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस ॲक्शन मोडवर आले असून काल दिवसभर मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी झडती घेण्यात आली. धार्मिक स्थळे, बाजारपेठा, हॉटेल्सची कसून तपासणी करण्यात आली. तसेतच गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. धमकीचे निनावी कॉल सुरु असतानाच विशेष अलर्ट आल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला दहशतवादी लक्ष करणार असल्याचं इनपुट सेंट्रल एजन्सी कडून मुंबई पोलिसांना मिळालं होतं. केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, मुंबईत काल दिवसभर पोलिसांकडून ठिकठिकाणी झाडझडती घेण्यात आली.  विविध भागांत कसून तपासणी करण्यात आली. तसेच धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून विशेष अलर्ट आल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र हे केवळ मॉक ड्रिल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण तरीही मुंबईतील अनेक शहरांत, भागांत कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं. धमकीचे निनावी कॉल सुरु असतानाच विशेष अलर्ट आल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले. शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात मॉकड्रिल केलं. या परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हे मॉक ड्रील करत कसून तपासणी करण्यात आली. विधानसभा निवडणूकांची अवघ्या काही दिवसांतच घोषणा होईल. महिना-दीड महिन्यांच्या अंतरावर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दंगली किंवा गालबोट लागेल, असं काही होऊ नये यासाठी मुंबई पोलीस खबरदारी घेत आगेत. त्यातच आता दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलीस अधिक अलर्ट झाले असून ठिकठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे.

सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षाही वाढवली 

मुंबईत दहशतवादी धोक्याचा इशारा दिल्यानंतर गर्दीच्या आणि धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

‘ कालच आम्हाला पोलिसांकडून धमकीची माहिती मिळाली. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत सहकार्य करण्यास सांगितले असून, आम्ही मंदिराच्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तपासणी केली जात असून त्यांच्यासोबत आणलेल्या सामानाचीही तपासणी केली जात आहे. मला वाटत नाही कोणात काही करण्याची हिंमत आहे. पण आपल्या देशात अशा धमक्या येत आहेत, हे दुर्दैव आहे, सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे’ असे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले.