नांदेड : राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून हा वाद विकोपाला गेला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर हे युद्ध आणखी वाढले. या सगळ्या घडामोडी चालू असतानाच शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाचा वाद विकोपाला गेला. ठाकरे गटाकडून पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चालू ठेवला. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांनी ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला चालू केली होती.
त्याच प्रमाणे सुषमा अंधारे यांच्यावरही प्रचंड टीका केली जाऊ लागली. त्यातूनच शिवसेनेच्या नेत्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्हही विधानं केली आहेत. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला.
आक्षेपार्ह टीका
सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना शिवसेनेच्या नेत्यांनी ज्या प्रमाणे कोणतीही मर्यादा पाळली नाही. त्याच प्रमाणे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनीही सुषमा अंधारे यांच्या आक्षेपार्ह टीका केली. त्यामुळे ठाकरे गटाकडून संजय शिरसाठ यांना लक्ष्य करण्यात आले.
आमदार संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करण्यात आल्यामुळे संजय शिरसाठ यांच्यावर टीका करण्यात आली. तर दुसरीकडे महिला आयोगानेही त्यांनी नोटीस बजावली. त्यामुळे आता हे प्रकरण प्रचंड तापले आहे.
खासगी आयुष्यातील गोष्टी उघड
सुषमा अंधारे आणि संजय शिरसाठ यांचे ही शाब्दिक चकमक सुरु असतानाच आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी संजय शिरसाठ यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी उघड करून सांगितल्या आहेत. त्यामुळे आता खैरे आणि गायकवाड वाद वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर टीका करताना संजय शिरसाठ हे जुगारात 1 कोटी रुपये कसे हरले होते त्याची त्यांनी आठवण करुन दिली आहे.
…आणि जुगारात ते हरले
यावेळी ते म्हणाले की, आमदार संजय शिरसाठ यांनी गोव्यामध्ये पत्यांच्या जुगारात सव्वा कोटी रुपये हरले होते, आणि ही घटना सगळ्या जनतेला माहिती आहे.
लोकं म्हणायची ते 5-5 दिवस मुंबईत पडून असतात पण त्यांना निवडून आणण्यासाठी मी अडीच हजार फोन केले होते आणि त्यांना निवडून देण्याची विनंती केली होती अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. संजय शिरसाठ हे आजा काहीही बरळत असले तरी मंत्रिपद मिळवण्यासाठी शिरसाठ यांची बडबड सुरू असल्याचा टोलाही खैरे यांनी त्यांना लगावला आहे.