मुंबई : ठाण्यातील शिवसेनेच्या शिवाई नगर येथील शाखे वरुन दोन गटात तुंबळ राडा झाला आहे. शिवसेना ( Shivsena ) आणि ठाकरे गटात ( Thackeray Group ) हा राडा झाला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात जे चाललं आहे ते थांबवा, हे जास्त दिवस चालणार नाही. सत्तेचा वापर करून ही दडपशाही केली जाणार असेल तर ती सहन केली जाणार नाही. एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचा भाजपकडून वापर सुरू आहे हे त्यांना लक्षात येत नाहीये, नंतर कळेल तेव्हा वेळ गेलेली असेल असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तुम्ही जे करताय ते योग्य नाही म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपवर निशाणा साधला आहे.
एकीकडे होळीचा सणाचा उत्साह असतांना दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाईनगर येथील शिवसेनेच्या शाखेचा ताबा घेतला आहे. यावरून शिवसेना आणि ठाकरे गत आमनेसामने आले होते. त्यावरून मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेनेने ही शाखा बळकवल्याचा आरोप करत ठाकरे गटाने शाखेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यांतर शाखेच्या परिसरात मोठे प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी यामध्ये दखल घेऊन गर्दी पांगवली होती.
ठाण्यातील शिवाई नगर येथील शाखेचा वाद चांगलाच उफाळून आला आहे. ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यात हा वाद सुरू झाला असून हे प्रकरण सध्या चांगलेच तापले असून रात्री उशिरा पर्यन्त राडा सुरू होता. दोन्ही गटाकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. मोठा पोलिस बंदोबस्त तयार लावण्यात आला होता.
यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधत ठाण्यात तुम्ही जे केलं ते तुम्हाला महागात पडेल असा इशारा दिला आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथील शाखेबाबत जो पर्यन्त न्यायालयाचा निकाल येत नाही, पोलिसांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
खरंतर शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दोन भाग पडले आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यावरून एकही संधी दोन्ही गटाकडून सोडली जात नाही. त्यातच आता ठाण्यातील शाखेचा वाद चांगलाच टोकाला गेला आहे.