खेड/रत्नागिरी : मी माँ साहेबांबरोबर लहान असताना कोकणात आलो होतो, तेव्हा तुमच्यासारखाच या मातीत बसलो होतो. त्यावेळेपासून कोकणातील आणि रत्नागिरीतील माणसांनी शिवसेनेवर प्रेम केले आहे.या भूमीतील माणसं देवमाणसं आहेत. म्हणून मी तुमच्याकडे साथ मागायला आलो आहे अशी साद कोकणवासियांना उद्धव ठाकरे यांनी खेडमधील सभेत घातली आहे. आज खेडमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडताना आपल्या पक्षाचे चिन्ह गोठवले, पक्ष पळवला अशी टीका करत तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्या वडिलांचे नाव काढून तुमच्या आई वडिलांचे नाव लावून निवडणूक लढवून दाखवा असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर टीका करताना त्यांनी बंडखोरीवेळची आठवण करून दिली आहे. आपण मुख्यमंत्री असताना राज्यात उद्योग व्यवसाय येत होते.
तर दुसरीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चालू असतानाही मी मुख्यमंत्री असताना कानडी मुख्यमंत्र्यांची हिम्मत नव्हती तर आता साधं डोळे वठारले तरी आमचे मुख्यमंत्री शेपूट घालतात असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर जहरी टीका करताना एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आहे. हे सांगताना निवडणूक आयोगावरही त्यांनी निशाणा साधला आहे.
त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना म्हणाले की, तुमच्या डोळ्याला जर मोतीबिंदू झाला नसाल तर खेडमधील गोळीबार मैदानावर येऊन बघा खरी शिवसेना कुणाची आहे असा जोरदार हल्लाबोल केला आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटावर जो अन्याय करायचा आहे त्या पद्धतीने त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे.ठाकरे गटाचे चिन्ह बदललं तरीही आम्ही अंधेरीमध्ये गड राखला आहे.
यांच्यातील अनेक जण असे आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना कधी पाहिलंही नाही ते माणसं आता आम्हाला शिवसेना समजून सांगू लागली आहेत असा टोलाही त्यांनी भाजपमधील नेत्यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर बोलताना सांगितले की, भूमिपुत्रांच्या न्यायहक्क्साठी आपण शिवेसना स्थापन केली असल्याचे सांगत त्यांनी आपण मुख्यमंत्री असताना सीमावादाची काय परिस्थिती होती ते सांगितले.
आपण मुख्यमंत्री असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर बोलायची कधी हिंमत केली नाही. मात्र आता पावलोपावली त्यांच्याकडून अपमान केला जात आहे तरीही यांच्याकडून चक्कार शब्द उच्चारला जात नाही.त्यांनी साधे डोळे वठारले तरी हे शेपूट घालतात असा जोरदार टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.