चंद्रपूर : शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला गेल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दुसरीकडे मात्र ठाकरे गटाने शिवगर्जना यात्रेलाही जोरदार पणे सुरुवात झाली आहे. मुंबईसह वेगवेगळ्या भागात शिवगर्जना यात्रा जोरदार सुरु असतानाच भद्रावती येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे त्यामुळे हा वाद विकोपाला जाणार की पक्षप्रमुखांकडे या वादाचे उत्तर मिळणार हे आता येणाऱ्या काळातच समजणार आहे.
राज्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. तर विरोधक म्हणून महाविकास आघाडीने हातात हात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात विरोधकांचे हे चित्र जनतेसमोर असतानाच आजच्या शिवगर्जना यात्रेत मात्र ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र काँग्रेसचे नेते बाळू धानोरकर यांना आमच्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही त्रास देत असाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशारा देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आहेत. मात्र आता चंद्रकांत खैरे यांच्या या इशारामुळे पक्षांतर्गत असलेल्या वादावर काय तोडगा निघणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बाळू धानोरकर यांना सुनावताना ते म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही लागू नका. जे काही पक्षप्रमुख सांगतील ते होईल, पण मध्ये तुम्ही बोलायचं नाही.
त्रास जर दिला तर मी तुमच्या पक्षाला सांगणार की तुमचा बाळू धानोरकर कोण आहे आणि त्याचे व्यवसाय काय आहे असा त्यांना थेट इशाराच दिल्यामुळे हा वाद वाढणार की वादावर पडदा पडणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
चंद्रकांत खैरे यांनी त्यांनी फक्त त्यांना इशाराच दिला आहे असं नाही तर. त्यांनी त्याही पुढे जाऊन म्हणाले की, जर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर तुमची मिसेस आमदार प्रतिभा धानोरकर देखील निवडून येणार नाही अशा भाषेत त्यांनी धानोरकर यांना सुनावले आहे.
हे भद्रावती आहे शिवसेनेचा विदर्भातील अतिशय जुना बालेकिल्ला आहे मात्र शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडणूक आलेल्या बाळू धानोरकर यांनी 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर बाळू धानोरकर खासदार झाले तर त्यांच्या पत्नी झाल्या आमदार, पण तेव्हा पासून काँग्रेस आणि शिवसेनेत आहे राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे हा या वादावर पक्षप्रमुख नेमका काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.