मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मनसेला धक्का, अविनाश जधवांनी घेतला मोठा निर्णय!

| Updated on: Dec 01, 2024 | 4:42 PM

विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी मनसेला खातं देखील उघडता आलं नाही, त्यानंतर आता पक्षाला पहिला धक्का बसला आहे.

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मनसेला धक्का, अविनाश जधवांनी घेतला मोठा निर्णय!
Follow us on

यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये कांटे की टक्कर पहायवा मिळाली. विधानसभा निवडणुकीत सर्वत्र महायुतीविरोधात महाविकास आघाडी असंच चित्र होतं. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तिसरी आघाडी यांनी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊन निवडणूक पूर्ण ताकतीनं लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीत मोठी चूरस निर्माण झाली. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यातील दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. निवडणूक निकालामध्ये महायुतीनं बाजी मारली.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला. तब्बल 230 जागांवर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट मिळून केवळ पन्नास जागाच जिंकता आल्या. महाविकास आघाडीला धक्का बसलाच मात्र त्याहून कितीतरी अधिक पटीनं मनसेला धक्का बसला. कारण मनसेला राज्यात खातं देखील उघडता आलं नाही. गेल्यावेळी मनसेचा एक आमदार निवडून आला होता, मात्र यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांचा देखील पराभव झाला. मनसे प्रमुख  राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आलेल्या अपयशाची जबाबदारी स्विकारून, मनसेचे  ठाणे -पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुक पोस्ट करत अविनाश जाधव यांनी राजीनाम्याबाबत माहिती दिली.

‘विषय : जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणेबाबत…

विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे.’ अशी पोस्ट अविनाश जाधव यांनी फेसबुकवर केली आहे.