ठाणे : गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका ठाणे, मुंब्रा, कळवा, शीळ फाटा, कल्याण फाटा परिसरात पाहायला मिळाला. सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र अनेक भागात पाहायला मिळालं होतं. दोन दिवसांपूर्वी शीळ फाटा आणि कल्याण फाटा या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. मात्र, आज ही परिस्थिती नाही. या भागात वाहतूक सुरळीत असल्याचं चित्र आज पाहायला मिळत आहे. (no traffic jam in Sheel Fata, Kalyan Fata area today)
ठाणे परिसरात काहीसा पाऊस सुरु आहे. असं असलं तरी आज शीळ फाटा आणि कल्याण फाटा परिसरात वाहतूक कोंडी नाही. त्यामुळे चाकरमान्यांना आणि अन्य मोठ्या वाहनांना आपल्या इप्सित स्थळी पोहोचण्यात अडचणी येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या शीळ फाटा, कल्याण फाटा, नवी मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर, तसंच ठाणे, मुंब्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी नाही. त्यामुळे वाहतूक सुरुळीत सुरु असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, पावसाने काहिशी उसंत दिली असली तरी पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यानं काल ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. नाशिक महामार्गावर तर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे ठाणेकरांना काल वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पाऊस थांबल्यानंतरही खाड्यांमुळे आणि रस्त्याच्या बाजूला चिखल झाल्यामुळे ठाणेकर पुन्हा वाहतूक कोंडीत अडकले होते. ठाणे-नाशिक हायवेवर नाशिककडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर ही वाहतूक कोंडी वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक अवजड वाहने असल्याने वाहतूक कोंडी अधिकच निर्माण झाली होती.
या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती. बराच वेळ ही रुग्णवाहिका अडकली होती. नंतर वाहतूक पोलिसांनी या रुग्णवाहिकेची वाहतूक कोंडीतून सुटका केली. खड्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी काढण्यासाठी वाहतूक विभागाच्या नाकीनऊ येत आहेत. एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन खड्डे भरण्याचे काम सुरू केलं. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच सुटेल असं सांगितलं गेलं.
Fast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 21 July 2021https://t.co/oZNIfJsD7Q#Rainnews | #Maharashtrarain | #MumbaiRainUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
संबंधित बातम्या :
डोक्यावर मुसळधार पाऊस, शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं, ठाण्याचे पालिका आयुक्त भर पावसात रस्त्यावर
no traffic jam in Sheel Fata, Kalyan Fata area today